सातपुडा कारखाना निवडणूक बिनविरोध निश्चित
By Admin | Updated: December 1, 2015 00:30 IST2015-12-01T00:30:49+5:302015-12-01T00:30:49+5:30
शहादा : सातपुडा साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध निश्चित झाली आहे.

सातपुडा कारखाना निवडणूक बिनविरोध निश्चित
शहादा : सातपुडा साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध निश्चित झाली आहे. 21 जागांपैकी आधीच तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. अर्ज माघारीनंतर उर्वरित 18 जागांसाठी 18 उमेदवार शिल्लक आहेत. दरम्यान, 5 डिसेंबर रोजी चेअरमपदाची निवड होणार आहे. सध्या कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. 21 जागांपैकी अर्ज छाननीअंती तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 18 जागांसाठी 27 उमेदवारी अर्ज शिल्लक होते. 30 नोव्हेंबर रोजी माघारीच्या अंतिम दिवशी नऊ जणांनी माघार घेतली. त्यामुळे 18 जागांसाठी 18 अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. 2 डिसेंबर रोजी अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होणार आहे.