सातपुडा गारठला

By Admin | Updated: December 26, 2015 00:35 IST2015-12-26T00:35:06+5:302015-12-26T00:35:06+5:30

सातपुडय़ात पारा घसरल्याने पर्वतराजी अक्षरश: गारठली आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळचे तापमानही घसरून 3 अंशावर स्थिरावले आहे.

Satpuda Garathla | सातपुडा गारठला

सातपुडा गारठला

नंदुरबार : सातपुडय़ात पारा घसरल्याने पर्वतराजी अक्षरश: गारठली आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळचे तापमानही घसरून 3 अंशावर स्थिरावले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील तापमान गेल्या आठवडय़ापासून घसरतच आहे. नंदुरबारचे तापमान सात अंशावर स्थिरावले आहे. सातपुडय़ाच्या तिस:या व चौथ्या रांगेतील अनेक गाव-पाडय़ांमध्ये थंडीचा कहर दिसून येत आहे. अनेक भागातील तापमान तीन ते चार अंशादरम्यान आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळचे तापमान शुक्रवारी पहाटे 3.7 अंशावर पोहचले होते. शीतलहरमुळे पहाटे दवदेखील पडत असल्यामुळे गारठय़ात वाढ होत आहे.

Web Title: Satpuda Garathla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.