विभागीय ग्रंथालय संघावर सतीश पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:11 IST2021-07-23T04:11:49+5:302021-07-23T04:11:49+5:30
पारोळा : नाशिक विभाग ग्रंथालय संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मावळते अध्यक्ष ॲड. संभाजी पगारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात ...

विभागीय ग्रंथालय संघावर सतीश पाटील
पारोळा : नाशिक विभाग ग्रंथालय संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मावळते अध्यक्ष ॲड. संभाजी पगारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. कुसुंबा, ता. धुळे येथील आश्रमशाळेत ही सभा झाली. कार्यकारिणीची मुदत संपल्याने डॉ. दत्ता परदेशी यांची अध्यक्षपदी, तर जळगाव जिल्ह्यातील पारोळ्याचे सतीश पाटील यांची नाशिक विभागावर कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
कार्यवाहक धुमाळ (चाळीसगाव) यांनी अहवाल वाचन करून सर्व विषय मंजूर करण्यात आले. कार्यकारी मंडळात कार्यवाहपदी प्रवीण पाटील (नंदुरबार) अजय शहा (नाशिक) यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी पाचही जिल्ह्यातील ग्रंथालय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचा शाल श्रीफळ पुष्पहार घालून मावळते अध्यक्ष ॲड. संभाजी पगारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी धुळे जिल्हाध्यक्ष अनिल सोनवणे, राहुल महिरे, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष प .एम. पाटील, संजय पाटील, किशोर पाटील, शशिकांत पाटील, संगीता पाटील, मनोज पाटील (पारोळा), मोरे (चोपडा), यशोद (चाळीसगाव ), अविनाश भदाणे (धुळे ) आर.ओ. पाटील (धुळे), रोहिदास हाके, हि.रा. चौधरी, भरत रोकडे सर्व धुळे आदी उपस्थित होते.