स्टेट बँकेच्या डेप्युटी जनरल मॅनेजवर प्राणघातक हल्ला
By Admin | Updated: March 28, 2017 23:54 IST2017-03-28T23:54:38+5:302017-03-28T23:54:38+5:30
मुद्रा लोन मंजूर न केल्याने जळगाव स्टेट बँकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर यांच्यावर तीन ते चार जणांनी प्राणघातक हल्ला

स्टेट बँकेच्या डेप्युटी जनरल मॅनेजवर प्राणघातक हल्ला
>ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. 28 - मुद्रा लोन मंजूर न केल्याने जळगाव स्टेट बँकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर यांच्यावर तीन ते चार जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजता शहरातील सहकारनगरातील सागर पॅलेसमध्ये घडली.
या हल्ल्यात डेप्युटी जनरल मॅनेजर प्रकाश मधुकर पाठक यांच्या पत्नी ज्योती पाठक जखमी झाल्या आहेत तर या दाम्पत्यांचा मुलगा आदीत्य पाठक हा गंभीर जखमी झाला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार संशयीत आरोपींनी आमचे मुद्रा लोन का मंजूर करत नाही? म्हणत पाठक दाम्पत्यांस धमकावले. प्र्रकाश पाठक यांना मारहाण करत असतानाच त्यांचा मुलगा आदित्य मध्ये आल्याने त्यास टी-पॉयवर आपटण्यात आले.
आरोपींचे एवढ्यावर समाधान झाले नाही तर त्यांनी टी-पॉय तुटलेल्या काचेद्वारेही मारहाण केल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरा तीन ते चार संशयीत आरोपींविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल होण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.