चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे सरपंच निवड बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 01:03 IST2019-09-28T01:02:31+5:302019-09-28T01:03:39+5:30
प्रमिला प्रकाश सोनवणे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड करण्यात आली.

चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे सरपंच निवड बिनविरोध
चोपडा, जि.जळगाव : तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या चहार्डी या गावात सरपंच पद गेल्या तीन महिन्यापासून मागील सरपंच उषाबाई रमेश पाटील यांच्यावर अविश्वास आल्याने रिक्त होते. त्यासाठी २७ रोजी सरपंच पदाची निवड झाली. त्यात प्रमिला प्रकाश सोनवणे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड करण्यात आली. सकाळी १० ते १२ या कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी त्याचा मंडळाधिकारी एस.एल.पाटील यांच्याकडे सरपंच पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्यात आले. त्यात प्रमिला प्रकाश सोनवणे आणि रुपाली पाटील या दोघींनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु काही काळानंतर रुपाली पाटील यांनी त्यांचा अर्ज माघारी घेतल्याने प्रमिला प्रकाश पाटील या सरपंचपदी बिनविरोध निवडून आल्या.
हजर ग्रामपंचायत सदस्यांमध्ये उपसरपंच किरण चौधरी, मीनाबाई पाटील, इंदुबाई वारडे, लीलाबाई भिल, कल्पनाबाई महाजन, रूपाली पाटील, धनंजय सुर्वे, वषाबाई पाटील, संजय मोरे, प्रशांत पाटील, संदीप पाटील, जगदीश पाटील, प्रमिला सोनवणे आणि तुळशीराम कोळी हे ग्रामपंचायत सदस्य सभेसाठी उपस्थित होते.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चहार्डी येथील मंडळाधिकारी एस.एल.पाटील व गोरगावले येथील मंडळाधिकारी आर.जे.बेलदार, तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी सुनील महाजन यांनी काम पाहिले. यावेळी बंदोबस्त चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे व पोलीस पाटील रोहित रायसिंग यांनी बंदोबस्त ठेवला.