सर्जा-राजाचे झाले घरोघरी झाले पूजन..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:22 IST2021-09-07T04:22:26+5:302021-09-07T04:22:26+5:30
बैलपोळ्या निमित्त शहरातील विविध भागामध्ये शेतकरी बांधव बैलांना सजवून, गावात मिरवणुक काढतांना दिसून आले. पिंपाळा, मेहरूण, महाबळ, आदर्श नगर, ...

सर्जा-राजाचे झाले घरोघरी झाले पूजन..
बैलपोळ्या निमित्त शहरातील विविध भागामध्ये शेतकरी बांधव बैलांना सजवून, गावात मिरवणुक काढतांना दिसून आले. पिंपाळा, मेहरूण, महाबळ, आदर्श नगर, अयोध्या नगर, शिव कॉलनी, बळीराम पेठ यासह शहराच्या विविध भागांमध्ये शेतकरी बांधव बैलांना आकर्षक पद्धतीने सजवून फिरवतांना दिसून आले. घरोघरी नागरिक या सर्जा-राजाची पूजा करतांना दिसून आले. तसेच शेतकरी बांधवानांही यावेळी ओवाळून, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतांना दिसून आले.
इन्फो :
रथ चौकातही बैल पोळा उत्साहात साजरा
शहरातील रथ चौकात दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहाने पोळा सण साजरा करण्यात आला. शेतकरी बांधवांनी आपल्या बैल जोडीचे पुजन करून, ग्रामदैवत श्रीराम मंदिराला प्रदक्षिणा घातली. ग्रामदैवत श्रीराम मंदिरातही ह.भ. प. मंगेश महाराज जोशी यांच्याकडे बैलांची पुजा करण्यात आली. यावेळी पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी श्रीराम महाराज जोशी, जुने जळगावचे पोलीस पाटील प्रभाकर चौधरी उपस्थित होते. दरम्यान, श्रावण सोमवार निमित्त श्रीराम मंदिरातही रूद्रभिषेक व महादेवाची आरती करण्यात आली.
इन्फो :
पांजरपोळ संस्थेतही पोळा उत्साहात साजरा
शहरातील १३० वर्ष जुन्या असलेल्या पांझरपोळ संस्थेतही सोमवारी पोळ्यानिमित्त बैलांना आंघोळ घालुन नवीन दोर , नाथ , मोरखी , पैंजण , गोंडे , गेठा , कवडी माळ , हार गजरे , झूल, घालुन सजवण्यात आले. त्यानंतर बैलांची पूजा करून, त्यांना पुरणपोळी, भिजवलेली हरभरा दाळ, व गुळ खाऊ घालण्यात आला. तसेच नंतर सर्व बैलाना मारूती मंदीरात दर्शनासाठी नेण्यात आले. यावर्षी एक नवीन बैल जोडी, दिलीप गांधी यांच्या तर्फे संस्थेस भेट देण्यात आली. यावेळी विजय काबरा,दिलीप गांधी,अशोक धुत, लक्ष्मीनारायण मणियार, नाना वाणी, हर्षद दोषी, राघव सतरा, दिलीप व्यास उपस्थित होते.