फैजपुरात स्वामिनारायण गुरूकुलात सरस्वती व कारका पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 18:08 IST2019-10-05T18:08:21+5:302019-10-05T18:08:41+5:30
श्री स्वामिनारायण गुरूकुलमध्ये सरस्वती व कारका पूजन करण्यात आले.

फैजपुरात स्वामिनारायण गुरूकुलात सरस्वती व कारका पूजन
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : श्री स्वामिनारायण गुरूकुलमध्ये दि. ५ रोजी सरस्वती व कारका पूजन करण्यात आले.
यावेळी २२० कारका म्हणजे विद्यार्थिनींचे पूजन करण्यात आले. तसेच त्यांना भोजन देण्यात आले.
नवरात्रीत चार दिवस सरस्वतीचे विशेष पूजन करण्यात येते. सप्तमीला प्रथमत: सरस्वतीला आव्हान करण्यात येते की, ‘आमच्या परिसरात आपण वास्तव्यास यावे व आमचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांना बुद्धीचे सदाचाराचे, सामर्थ्य देव दृष्ट विचार टाकून देण्याची ताकद दे...’
यावेळी संस्थेचे अध्यक्ष शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे आर्शीर्वचन झाले. त्यामध्ये त्यांनी कारका पूजन सरस्वतीचे पूजनाचे महत्व विशद केले.
यावेळी संस्थेचे खनिजदार शास्त्री भक्तीस्वरूपदासजी, ट्रस्टी पी. डी. पाटील, प्राचार्य संजय वाघुळदे, होले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.