नशिराबादला संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:22 IST2021-09-05T04:22:07+5:302021-09-05T04:22:07+5:30
नशिराबाद : श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री संत सेना महाराजांच्या मूर्तीस अभिषेक व पूजन लोकेश ...

नशिराबादला संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी
नशिराबाद : श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री संत सेना महाराजांच्या मूर्तीस अभिषेक व पूजन लोकेश गालफाडे यांच्या हस्ते सपत्नीक झाले. याप्रसंगी मंदिराच्या आवारामध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पालखी पूजन जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पालखी सोहळ्यानंतर ह.भ.प. नितीन महाराज सोनवणे खिर्डीकर यांचे कीर्तन झाले. कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
यशस्वीतेसाठी नाभिक पंच मंडळ नशिराबाद अध्यक्ष राजेंद्र आमोदकर, रमेश गालफाडे, परभत चौधरी, संजय गालफाडे, डाॅ. प्रमोद आमोदकर, उमेश गालफाडे, ज्ञानेश्वर आमोदकर, नरेंद्र निकम, सचिन आलोकार, डिगंबर आमोदकर, बाळू निंबाळकर, दत्तू शिवरामे, जितेंद्र अंबिकर, पांडुरंग गालफाडे, विनोद शिवरामे, प्रमोद टेमकर, गोपाळ बोरणारे, ह.भ.प. सुनील शास्त्री महाराज, अक्षय टेमकर, कैलास टेमकर, तसेच बेलव्हाळ येथील टाळकरी मंडळी हतनूर येथील भजनी मंडळ संत सावता महाराज व विठ्ठल मंदिर भजनी मंडळ यांचे सहकार्य लाभले.