संत नरहरी महाराज सोनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:21 IST2021-08-21T04:21:04+5:302021-08-21T04:21:04+5:30
जळगाव : महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगावतर्फे अखिल भारतीय अहिर सुवर्णकार शिक्षण प्रसारक संस्था, जळगाव येथे श्री. संत नरहरी महाराज ...

संत नरहरी महाराज सोनार
जळगाव : महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगावतर्फे अखिल भारतीय अहिर सुवर्णकार शिक्षण प्रसारक संस्था, जळगाव येथे श्री. संत नरहरी महाराज जयंती उत्सव सोहळा शुक्रवारी उत्साहात संपन्न झाला.
उत्सव सोहळ्याप्रसंगी अखिल भारतीय अहिर सुवर्णकार शिक्षण प्रसारक संस्था, महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव, जि. जळगाव, अहिर सुवर्णकार महिला मंडळ व अन्य सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष संजय विसपुते यांनी आपल्या मनोगतात अनेकविध प्रकारच्या उत्सवांमुळेच समाज एकीकरण शक्य होते, असे नमूद करून समाज एकीकरणासाठी सर्व संस्थांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे मत मांडले. कार्यक्रमप्रसंगी संत नरहरी महाराज प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली. याप्रसंगी नगरसेविका रंजनाबाई विजय वानखेडे, विजय वानखडे, प्रभाग समिती सदस्य संजय विसपुते, संजय पगार, राजेंद्र विसपुते, गणेश दापोरेकर, दीपक जाधव, उत्तमराव नेरकर, रमेश सोनार, विनोद सोनार, भगवान सोनार, किशोर बागुल, सुरेश सोनार, विनोद विसपुते, विजय बागुल, सुभाष सोनार, रत्नाकर दुसाने, सागर बागुल, राजेंद्र दुसाने आदी समाजबांधव उपस्थित होते.