सहकार भारती प्रदेशाध्यक्षपदी संजय बिर्ला

By Admin | Updated: June 2, 2014 17:48 IST2014-06-02T17:48:50+5:302014-06-02T17:48:59+5:30

नाशिक येथे सुरू असलेल्या सहकार भारतीच्या ९ व्या प्रदेश अधिवेशनात जळगाव जनता सह.बँकेचे अध्यक्ष संजय बिर्ला यांची आगामी तीन वर्षांसाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून एकमताने फेरनिवड निवड झाली.

Sanjay Birla as Co-operative Bharti State President | सहकार भारती प्रदेशाध्यक्षपदी संजय बिर्ला

सहकार भारती प्रदेशाध्यक्षपदी संजय बिर्ला

 

जळगाव : नाशिक येथे सुरू असलेल्या सहकार भारतीच्या ९ व्या प्रदेश अधिवेशनात जळगाव जनता सह.बँकेचे अध्यक्ष संजय बिर्ला यांची आगामी तीन वर्षांसाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून एकमताने फेरनिवड निवड झाली. सूचक म्हणून वर्धा येथील केशवराव दांडेकर तर अनुमोदक म्हणून परभणी येथील प्रदीपराव देशमुख व विजय कुलकर्णी होते. या वेळी महामंत्रीपदी शिवाजीराव पाटील यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राष्ट्रीय महामंत्री प्रा.डॉ.उदय जोशी यांनी काम पाहिले. 
आश्रमशाळेस मिळणार ग्रीन बोर्ड
जळगाव- सामाजिक न्याय विभागाअंतर्गत स्वयंसेवी संस्थांतर्फे चालविल्या जाणार्‍या विभाजन प्राथमिक आश्रमशाळांमधील इयत्ता ४ थी ते ७ वीच्या वर्गांकरिता ग्रीन बोर्ड पुरविण्यात येणार आहे. आश्रमशाळांमधील मुलामुलींना देण्यात येणार्‍या सुविधांमध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Web Title: Sanjay Birla as Co-operative Bharti State President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.