संगीता पाटील दुस:यांदा शहादा नगराध्यक्षपदी

By Admin | Updated: November 8, 2015 00:16 IST2015-11-08T00:16:31+5:302015-11-08T00:16:31+5:30

शहादा : येथील नगराध्यक्षपदाची संगीता विजय पाटील यांना चालू पंचवार्षिकमध्ये दुस:यांदा संधी मिळाली आहे.

Sangeeta Patil Second: Yanda is the President of Shahada Nagar | संगीता पाटील दुस:यांदा शहादा नगराध्यक्षपदी

संगीता पाटील दुस:यांदा शहादा नगराध्यक्षपदी

शहादा : येथील नगराध्यक्षपदाची संगीता विजय पाटील यांना चालू पंचवार्षिकमध्ये दुस:यांदा संधी मिळाली आहे.

पालिकेत दीपक पाटील यांच्या गटाची सत्ता आहे. शेवटच्या एका वर्षासाठी नगराध्यक्ष निवड शनिवारी करण्यात आली. दीपक पाटील गटातर्फे संगीता पाटील यांनी तर विरोधी गटातर्फे सुनंदा अरुण चौधरी यांनी अर्ज भरला होता.

संगीता पाटील यांना 18 मते मिळाली तर सुनंदा चौधरी यांना सहा मते मिळाली. संगीता पाटील यांना सत्ताधारी गटाने दुस:यांदा संधी देऊन त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. उपनगराध्यक्षपदी सत्ताधारी गटातीलच कोकिळाबाई त्र्यंबक चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Web Title: Sangeeta Patil Second: Yanda is the President of Shahada Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.