शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

साने गुरुजी विद्यामंदिर, ओरियन अंतिम फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:59 AM

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : जैन स्पोर्ट्स् अकॅडमी आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या १३ व्या जैन ज्युनियर चॅलेंज चषक क्रिकेट स्पर्धेत ओरियन इंग्लिश स्कूल आणि साने गुरुजी विद्यामंदिराने अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीत ओरियन स्कूलने झांबरे विद्यालयाचा ८ गड्यांनी तर साने गुरुजी विद्यामंदिराने अनुभूती स्कूलचा १० गडी राखून पराभव केला.शुक्रवारी ...

ठळक मुद्देसाने गुरुजी विद्यामंदिराचा नैनदीप सांगोरे हा सामनावीराचा मानकरी ठरला.ओरियन स्कूलचा गोविंद निंभोरे सामनावीरसानेगुरुजी विद्यामंदिराचा १० गडी राखून पराभव

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : जैन स्पोर्ट्स् अकॅडमी आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या १३ व्या जैन ज्युनियर चॅलेंज चषक क्रिकेट स्पर्धेत ओरियन इंग्लिश स्कूल आणि साने गुरुजी विद्यामंदिराने अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीत ओरियन स्कूलने झांबरे विद्यालयाचा ८ गड्यांनी तर साने गुरुजी विद्यामंदिराने अनुभूती स्कूलचा १० गडी राखून पराभव केला.शुक्रवारी अनुभूती स्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या पहिल्या सामन्यात ए.टी. झांबरे विद्यालयाने प्रथम फलंदाजी करताना १० षटकांत ८ बाद ३५ धावा केल्या. त्यात तेजस कोळी याने ८ धावांचे योगदान दिले तर अवांतर १० धावा मिळाल्या. ओरियन स्कूलच्या ऋषिकेश माळी याने दोन गडी बाद केले. तर हर्षवर्धन मालू आणि आदित्य विसपुते यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरात ३६ धावांचे विजयी लक्ष्य ओरियन स्कूलने २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. गोविंद निंभोरे याने नाबाद १८ धावा केल्या. तर पार्थ देवकर याने ८ धावांचे योगदान दिले. गोविंद निंभोरे याला सामनावीराचा बहुमान देण्यात आला. झांबरे विद्यालयाच्या चैतन्य बडगुजर आणि यश शिरसाळे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. अनुभूती स्कूलने साने गुरुजी विद्यामंदिराविरोधात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित १० षटकांत ३३ धावा केल्या. वेदांत राठोड याने १४ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात साने गुरुजी विद्यामंदिराने ५.२ षटकांत एकही गडी न गमावता ३४ धावा केल्या. नैनदीप सांगोरे याने २० धावा केल्या.स्पर्धेचा अंतिम सामना १ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता अमळनेरच्या साने गुरुजी विद्यामंदिर विरुद्ध ओरियन स्कूल असा होणार आहे.