साने गुरुजी विद्यामंदिर, ओरियन अंतिम फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:02 IST2017-09-23T00:59:12+5:302017-09-23T01:02:30+5:30

 Sane Guruji Vidyamandir, Orion in the final round | साने गुरुजी विद्यामंदिर, ओरियन अंतिम फेरीत

साने गुरुजी विद्यामंदिर, ओरियन अंतिम फेरीत

ठळक मुद्देसाने गुरुजी विद्यामंदिराचा नैनदीप सांगोरे हा सामनावीराचा मानकरी ठरला.ओरियन स्कूलचा गोविंद निंभोरे सामनावीरसानेगुरुजी विद्यामंदिराचा १० गडी राखून पराभव

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जैन स्पोर्ट्स् अकॅडमी आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या १३ व्या जैन ज्युनियर चॅलेंज चषक क्रिकेट स्पर्धेत ओरियन इंग्लिश स्कूल आणि साने गुरुजी विद्यामंदिराने अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीत ओरियन स्कूलने झांबरे विद्यालयाचा ८ गड्यांनी तर साने गुरुजी विद्यामंदिराने अनुभूती स्कूलचा १० गडी राखून पराभव केला.
शुक्रवारी अनुभूती स्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या पहिल्या सामन्यात ए.टी. झांबरे विद्यालयाने प्रथम फलंदाजी करताना १० षटकांत ८ बाद ३५ धावा केल्या. त्यात तेजस कोळी याने ८ धावांचे योगदान दिले तर अवांतर १० धावा मिळाल्या. ओरियन स्कूलच्या ऋषिकेश माळी याने दोन गडी बाद केले. तर हर्षवर्धन मालू आणि आदित्य विसपुते यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरात ३६ धावांचे विजयी लक्ष्य ओरियन स्कूलने २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. गोविंद निंभोरे याने नाबाद १८ धावा केल्या. तर पार्थ देवकर याने ८ धावांचे योगदान दिले. गोविंद निंभोरे याला सामनावीराचा बहुमान देण्यात आला. झांबरे विद्यालयाच्या चैतन्य बडगुजर आणि यश शिरसाळे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. अनुभूती स्कूलने साने गुरुजी विद्यामंदिराविरोधात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित १० षटकांत ३३ धावा केल्या. वेदांत राठोड याने १४ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात साने गुरुजी विद्यामंदिराने ५.२ षटकांत एकही गडी न गमावता ३४ धावा केल्या. नैनदीप सांगोरे याने २० धावा केल्या.

स्पर्धेचा अंतिम सामना १ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता अमळनेरच्या साने गुरुजी विद्यामंदिर विरुद्ध ओरियन स्कूल असा होणार आहे.

Web Title:  Sane Guruji Vidyamandir, Orion in the final round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.