वाळू वाहतूक करणा:या डंपरच्या धडकेत चौघे जखमी
By Admin | Updated: June 17, 2017 17:10 IST2017-06-17T17:10:02+5:302017-06-17T17:10:02+5:30
उपचारासाठी जळगावला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले

वाळू वाहतूक करणा:या डंपरच्या धडकेत चौघे जखमी
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 17 - जळगाव औरंगाबाद मार्गावर उमाळा फाटय़ानजीक वाळू वाहतूक करणा:या डंपरने कारला जोरदार धडक दिल्याने जामनेर येथील व्यापारी जितेंद्र बाबुलाल सिसोदिया (वय 42), त्यांची आई सजनबाई सिसोदिया (वय 65), प}ी नीता सिसोदिया (वय 37), विधी महावीर सिसोदिया (वय 11) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जळगावला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विधी हिच्या डोक्याला मार लागला असून जितेंद्र यांनाही मार लागला आहे. केवळ नशीब बलवत्तर म्हणून या अपघातातून ते बचावले. जामनेर येथील प्रल्हाद बोरसे यांनी जखमींना दुस:या वाहनातून जळगावला रवाना केले. जितेंद्र सिसोदिया हे कुटुंबासह जळगाव येथे दवाखान्यात असलेल्या नातेवाईकांना पाहण्यासाठी जात होते. त्या वेळी हा अपघात झाला.