आरक्षण वाचवण्यासाठी समता परिषदेचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:46 IST2020-12-04T04:46:35+5:302020-12-04T04:46:35+5:30
जळगाव : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे ओबीसी समाजाने आरक्षण वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. रेल्वे स्थानकाजवळील ...

आरक्षण वाचवण्यासाठी समता परिषदेचा मोर्चा
जळगाव : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे ओबीसी समाजाने आरक्षण वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. रेल्वे स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे - खेवलकर या उपस्थित होत्या. यावेळी आंदोलकांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे; मात्र त्यासाठी ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, अशी मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सतीश महाजन, शालीग्राम मालकर, सरिता कोल्हे, प्रकाश मालकर, ॲड. वैशाली महाजन, निवेदिता ताठे, मंगला बारी, सुरेश सोनार, भारती काळे यांच्यासह विविध संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी उपिस्थत होते.
स्वातंत्र्य चौकात ठिय्या
समता परिषदेने राज्यभर हे आंदोलन सुरू केले आहे. त्यात माजी खासदार समीर भुजबळ यांना पु्ण्यात अटक करण्यात आल्याच्या निषेधार्ह स्वातंत्र्य चौकात काही काळ ठिय्या आंदोलन केले.