बलसाड येथे सलीम पटेलची मिरवणूक

By Admin | Updated: July 13, 2017 17:46 IST2017-07-13T17:46:23+5:302017-07-13T17:46:23+5:30

खान्देशी स्वत:चा जीव धोक्यात घालून दुस:यांचा जीव वाचविल्याची व्यक्त केली भावना

Salim Patel's procession at Balasad | बलसाड येथे सलीम पटेलची मिरवणूक

बलसाड येथे सलीम पटेलची मिरवणूक

ऑनलाईन लोकमत

पिंपरखेड ता. भडगाव,दि.13- अतिरेक्यांच्या हल्ल्यातून अनेक यात्रेकरूंना सुखरूप नेणारा सलीम पटेल यांची बलसाड येथे मिरवणूक काढण्यात आली. तो भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील मूळचा रहिवासी असून जवळपास 15 वर्षापासून त्यांचे कुटुंब बलसाड (गुजरात) येथे स्थलांतरीत झाले आहे. गावातील तरुणाचा गौरव होत असल्यामुळे येथील गावक:यांमध्ये अभिमान व्यक्त होत आहे.
सलीमच्या या शौर्याबद्दल काश्मिर सरकारने 3 लाख रुपये बक्षीस जाहीर केले तसेच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी सलीमचे कौतुक करून त्याचे नाव शौर्य पदकासाठी सूचविले आहे. याचबरोबर  गुजरात सरकारने 3 लाख रुपये व केंद्र सरकारने 5 लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे.
सलीमच्या या कार्याबद्दल गुजरात येथील बलसाड येथे बुधवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात ‘दहशतवादी मुर्दाबाद, हिन्दूस्थान जिन्दाबाद’ तसेच ‘आतंक वाद को संदेश हे की हिन्दूस्थानका हर हिन्दूस्थानी सलीम है’ अशा घोषणा देण्यात आल्या. खान्देशात जन्म घेतल्याचा सार्थ अभिमान आहे असे सलीमने गुजराती जनतेसमोर यावेळी सांगितले. खान्देशी लोक नेहमी प्रामाणिक असतात. आपला जीव धोक्यात टाकून दुस:याला वाचवण्याचा प्रयत्न  करीत असतात. बसवर जेव्हा गोळीबार झाला तेव्हा देवानेच मला हिम्मत दिली
दरम्यान, गावात सलीमचे कौतुक होत असून पोलीस पाटील संघटनचे जिल्हा उपाध्यक्ष विलास पाटील,  वि.का.स.सो. चेअरमन शांताराम माणिक पाटील, वि.का.सो. माजी चेअरमन सुरेश शिवराम पाटील,  माजी सरपंच डॉ.प्रमोद पाटील आदींनी सलीमच्या कार्याबद्दल गौरवास्पद उद्गार काढले.
 

Web Title: Salim Patel's procession at Balasad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.