एमआरपी मूल्याने विक्रीमुळे मद्यप्रेमींची चंगळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:13 IST2021-06-18T04:13:02+5:302021-06-18T04:13:02+5:30
एरंडोल : धुळ्याच्या एका व्यावसायिकाने येथे वाईन शॉप चालवायला घेतले असून त्यांनी सर्व प्रकारचे विदेशी मद्य एमआरपी मूल्याने विक्री ...

एमआरपी मूल्याने विक्रीमुळे मद्यप्रेमींची चंगळ
एरंडोल : धुळ्याच्या एका व्यावसायिकाने येथे वाईन शॉप चालवायला घेतले असून त्यांनी सर्व प्रकारचे विदेशी मद्य एमआरपी मूल्याने विक्री करण्याची योजना सुरू केली. मद्यशौकिनांच्या गोटातून या योजनेचे जोरदार स्वागत करण्यात येत असून या याेजनेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
दिवसभर या दुकानावर मद्यप्रेमी व शौकिनांची झुंबड उडालेली दिसून येते. या योजनेचा इतर मद्यविक्री दुकानांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांनीसुद्धा एमआरपीने विक्री सुरू केली आहे. शहरात कोणत्याही भागात एमआरपीची सुविधा झाल्यामुळे मद्यप्रेमींना सुगीचे दिवस आले आहेत. एरंडोल शहरात हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच परवानाधारक बियर शॉप, हॉटेल्स, बार आहेत. त्यात पहिल्या-वहिल्या वाईनशॉपची भर पडली आहे. काहींनी आपले अस्तित्व टिकविण्यासाठी विक्रेत्यांनी विनामूल्य थंडगार पाण्याची बाटली, चखणा, फ्री कोल्ड्रिंक अशी आमिषे ग्राहकांपुढे ठेवली जात आहेत.