शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

शिवसेना आक्रमक : जळगाव मनपा समोरच भाजीपाला विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 12:00 IST

अवैध हॉकर्सला हटवून रस्ते मोकळे करा

जळगाव : शहराची पुर्वीची ओळख ‘सुंदर शहर, स्वच्छ शहर’ ही आता बदलत जात असून, जळगाव शहर आता ‘अतिक्रमणाचे, वाहतूक कोंडीचे’ शहर होत जात आहे. शहरातील मुख्य रस्त्यालगत अनधिकृत हॉकर्सकडून सर्रासपणे व्यवसाय थाटला जात असल्याने नागरिकांना वाहने चालविताना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचा मागणीसाठी शिवसेनेने मंगळसारी सकाळी ११ वाजता चक्क मनपासमोरच भाजीपाला व फळे विक्री करून अनोखे आंदोलन केले.यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, गटनेते अनंत जोशी, नगसेवक गणेश सोनवणे, अमर जैन, महिला आघाडीच्या महानंदा पाटील, शोभा चौधरी, मनिषा चौधरी यांच्यासह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांनी येणाऱ्या जाणाºया नागरिकांना कमी दरात भाजीपाला व फळे देखील विक्री केली. रस्त्यावर व्यवसाय थाटले जात असल्याने शहरातील प्रत्येक रस्त्यावर वाहतूककोंडी होत असल्याने नागरिकांना वाहने चालविणे तर सोडाच पायी चालणे देखील कठीण झाले असल्याचे शिवसेनेने प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.उपायुक्तांनी येवून स्वीकारले निवेदनशिवसेनेने फळ व भाजीपाला विक्री करून केलेल्या अनोख्या आंदोलनामुळे नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मनपा उपायुक्त उत्कर्ष गुट्टे यांनी तत्काळ आंदोलकांची भेट घेट घेवून त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारले. तसेच अतिक्रमण कारवाई सुरुच असून, कारवाईअजून तीव्र करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, १५ दिवसात शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.लाखो रुपयांची अवैध वसुलीचा आरोपशिवसेनेकडून महापौरांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात सुमारे १० हजार २८४ फेरीवाले मुख्य रस्त्यांवर अनधिकृतपणे व्यवसाय करत आहेत. अशा फेरीवाल्यांकडून अनेकजण लाखो रुपयांची दररोज अवैधपणे वसुली करत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. तसेच रात्रीच्या वेळेस मांसाहारी व विविध खाद्यपदार्थ विक्री करणाºया फेरीवाल्यांच्या दुकानांवर जास्त करून दारु पिणारेच ग्राहक असतात. त्यामुळे अनेक वाद याच ठिकाणी निर्माण होतात यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होत आहे.या भागात होते अतिक्रमणशहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते चित्रा चौक, गोविंंदा रिक्षा स्टॉप ते टॉवर चौक, सुभाष चौक ते राजकमल चौक, टॉवर चौक ते भिलपूरा, बळीराम पेठ, रेल्वे स्टेशन ते नेहरू चौक, महाबळ परिसर, प्रभात चौक व महाराणा प्रताप पुतळा, गुजरात पेट्रोल पंप,रामानंदनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यातच या ठिकाणी खरेदी करण्यासाठी आलेले नागरिक देखील रस्त्यावरच वाहने उभे करतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी देखील होत असते. त्यामुळे मनपाने तत्काळ अनधिकृत हॉकर्सचा बंदोबस्त करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव