खिरवड येथील सालदाराचा विहिरीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:13 IST2021-06-06T04:13:30+5:302021-06-06T04:13:30+5:30

रावेर : तालुक्यातील खिरवड येथील एका शेतकऱ्याच्या वाड्यात रहिवासास असलेला सालदार तीन- चार दिवसांपासून बेपत्ता असताना शनिवारी त्याचा मृतदेह ...

Saldar of Khirwad drowned in a well | खिरवड येथील सालदाराचा विहिरीत बुडून मृत्यू

खिरवड येथील सालदाराचा विहिरीत बुडून मृत्यू

रावेर : तालुक्यातील खिरवड येथील एका शेतकऱ्याच्या वाड्यात रहिवासास असलेला सालदार तीन- चार दिवसांपासून बेपत्ता असताना शनिवारी त्याचा मृतदेह खिरवड शिवारातील विहिरीत आढळून आल्याने रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

खिरवड येथील प्रमोद सुधाकर लासूरकर यांच्याकडे दोन वर्षांपासून शेतीकामासाठी असलेला सालदार कुंवरसिंग मंगलसिंग बारेला हा कुटुंबासह खळवाड्यात वास्तव्यास होता.

गत तीन चार दिवसांपासून तो काही एक न सांगता घरून निघून गेला होता. तत्संबंधी त्याची पत्नी लुंगा हीने हरवल्याबाबतची नोंद रावेर पोलिसात केली होती. दरम्यान, त्यांचा मृतदेह दुपारी १ वाजताच्या सुमारास खिरवड शिवारातील सुधाकर नामदेव चौधरी यांच्या शेतातील विहिरीत पाण्यात तरंगताना आढळून आला.

यासंबंधी प्रमोद सुधाकर लासूरकर यांनी दिलेल्या खबरीवरून रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अर्जून सोनवणे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Saldar of Khirwad drowned in a well