साक्री पालिकेची चावी महिलेकडे!

By Admin | Updated: November 25, 2015 01:12 IST2015-11-25T01:12:17+5:302015-11-25T01:12:17+5:30

साक्री : साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी मंगळवारी सोनल सुमित नागरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे.

Sakri municipality's key woman! | साक्री पालिकेची चावी महिलेकडे!

साक्री पालिकेची चावी महिलेकडे!

साक्री : साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी मंगळवारी सोनल सुमित नागरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. त्याची अधिकृत घोषणा 27 नोव्हेंबर रोजी होणा:या नगरपंचायतीच्या विशेष सभेत होणार आहे. सोनल नागरे यांना साक्रीच्या प्रथम नगराध्यक्षा होण्याचा बहुमान मिळाला आहे.

साक्री नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती.

उपाध्यक्ष निवड

नगराध्यक्षपदाची निवड जाहीर झाल्यानंतर त्याचठिकाणी लगेच उपनगराध्यक्षाचीही निवड होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या वाटय़ाला सभापतीपद येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Sakri municipality's key woman!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.