मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे संत मुक्ताई जयंती उत्सव थाटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 19:32 IST2019-09-29T19:31:07+5:302019-09-29T19:32:22+5:30

श्रीक्षेत्र कोथळी येथे संतमुक्ताई जयंती साजरी करण्यात आली.

Saint Muktai Jubilee celebrations at Kothali in Muktinagar taluka | मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे संत मुक्ताई जयंती उत्सव थाटात

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे संत मुक्ताई जयंती उत्सव थाटात

ठळक मुद्देमुक्ताई अभिषेक व पूजनमंदिरावर पारायण

मुक्ताईनगर, जि.जळगाव : श्रीक्षेत्र कोथळी येथे संतमुक्ताई जयंती साजरी करण्यात आली. आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई यांचा घटस्थापनेच्या दिवशीच जन्मदिवस असल्याने रविवारी घटस्थापनेच्या दिवशी पहाटे पाचला संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांच्या हस्ते मुक्ताई अभिषेक व पूजन करण्यात आले.
याप्रसंगी रवींद्र हरणे, उद्धव महाराज जुणारे, पुरुषोत्तम वंजारी उपस्थित होते. मंदिरावर मुक्ताई पारायण करण्यात आले. नवे मंदिर येथे रुपेश पाटील यांनी पूजा अभिषेक केले. दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे जुने कोथळी येथील तुळजा भवानीमंदिरात सकाळी साडेदहाला खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
येथे अब्ज चंडी अंतर्गत भव्य दुर्गा सप्तशती पाठसोहळा घेण्यात आले. पाठ सोहळा प्रारंभापूर्वी नगरसेवक संतोष मराठे यांनी सपत्नीक आरती केली. अब्ज चंडी अंतर्गत भव्य दुर्गा सप्तशती पाठ सोहळ्याला शेकडो महिला व पुरुष सेवेकरी यांनी सेवा केली. ईश्वर पाटील व महेंद्र गावंडे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात पाठ वाचन केले.
प्रसंगी यामिनी चंद्रकांत पाटील, ग्रा.पं.च्या माजी सदस्या अनिता शिवाजी मराठे, दुर्गा संतोष मराठे, कल्पना जावळे, संगीता भोलाणे, वैशाली एदलाबादकर, भारती भोई, नीता पाटील, संजना पाटील, प्रियंका पाटील यांच्यासह शेकडो महिला सेवेकरी पाठसोहळ्यात झाल्या होत्या.
जे खळांची व्यंकटी सांडो!
तया सत्कर्मी रती वाढो! !
या ब्रीदानुसार गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या जगाच्या कल्याणासाठी नवरात्रोत्सव काळात अब्ज चंडी सेवे अंतर्गत वरील सेवेची आज्ञा आहे. त्यात योगायोगाने घटस्थापनेला आदिशक्ती मुक्ताबाई दिवस जन्मदिवस असतो. त्यामुळे सेवेकरी आवर्जून ही सेवा मुक्ताई चरणी देत असतात. दिवसभर मोठ्या प्रमाणात भाविकांनी मुक्ताई दर्शनाचा लाभ घेतला.

Web Title: Saint Muktai Jubilee celebrations at Kothali in Muktinagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.