हरताळ्याचे साई मंदिर पर्यटक, भाविकांना खुणावतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 15:11 IST2020-08-26T15:09:53+5:302020-08-26T15:11:04+5:30
यंदा निसर्गाच्या कृपेमुळे येथील पर्यटन स्थळ असलेला तलाव व त्या तलावात उभारण्यात आलेले साईमंदिर हे अगदी एखाद्या बेटावरील नयनरम्य विहंगम दृष्य जणूकाही पर्यटक व भाविकांना आकर्षित करीत आहे.

हरताळ्याचे साई मंदिर पर्यटक, भाविकांना खुणावतेय
चंद्रमणी इंगळे
हरताळे, ता. मुक्ताईनगर : यंदा निसर्गाच्या कृपेमुळे येथील पर्यटन स्थळ असलेला तलाव व त्या तलावात उभारण्यात आलेले साईमंदिर हे अगदी एखाद्या बेटावरील नयनरम्य विहंगम दृष्य जणूकाही पर्यटक व भाविकांना आकर्षित करीत आहे.
यंदा तलाव व मंदिर परिसरात सगळीकडे हिरवळ दाटलेली आहे. परिणामी हिरवळीमुळे सगळीकडे आनंदी आनंद वातावरण दिसत आहे.
हरताळे येथील श्री चक्रधर स्वामी मंदिर, पुरातन शिवशक्ती मंदिर व त्याच जोडीला असलेले मातृ-पितृ भक्त श्रावण बाळाचे मंदिर आदींच्या पावन स्मृतीमुळे गावाचा देखावा सर्वांनाच डोळ्यात भुरळ पाडत आहे. तसेच यापैकी चहूबाजूने पाणी असलेले साई मंदिर पर्यटकांना खुणावत आहे. असे असले तरी कोरोनामुळे भाविकांसह पर्यटक दुर्मिळ झाले आहे.