खडसे कुटुंबीयांशी सागर चौधरीची जवळीक

By Admin | Updated: October 19, 2015 00:42 IST2015-10-19T00:42:33+5:302015-10-19T00:42:33+5:30

एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, गुरुनाथ यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सागर याची उपस्थिती होती, असे असतानाही खडसे यांनी सागरशी कोणताही संबध नसल्याचे वक्तव्य केले .

Sagar Chaudhary's affair with Khadse family | खडसे कुटुंबीयांशी सागर चौधरीची जवळीक

खडसे कुटुंबीयांशी सागर चौधरीची जवळीक

जळगाव : महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या कुटुंबीयांशी वाळू व्यावसायिक सागर चौधरी याची जवळीक आहे. खुद्द एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, गुरुनाथ यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सागर याची आवजरुन उपस्थिती होती, असे असतानाही खडसे यांनी सागर याच्याशी आपला कोणताही संबध नसल्याचे वक्तव्य केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, या वक्तव्यानंतर खडसे कुटुंबीयांसोबत सागर चौधरी यांची कशी जवळीक आहे, हे दर्शविणारे छायाचित्र सोशल मीडियावर दिवसभर व्हायरल होत असल्याने जिल्हाभरात चर्चा रंगली होती.

सागर वाळू व्यावसायिक

सागर चौधरी हा वाळू व्यावसायिक आहे. सागर याने पोलीस निरीक्षक सादरे यांनी आपल्याकडून खंडणी मागितली होती. सादरे यांनी धमकावत असतानाच पिस्तूल रोखले होते, असे आरोप केले आहेत. त्यानंतर त्याने यासंदर्भात न्यायालयात फिर्याद केली व न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणी सादरे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता.

पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये सागर चौधरीचा उल्लेख आहे. वाळू व्यावसायिक सागरच्या मदतीने आपल्याला गोवले गेल्याचे सादरे यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. यामुळे सागरवर नाशिक येथील पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

गणेशोत्सवातही गुन्हा दाखल

यंदा गणेश विसजर्न मिरवणुकीत एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणात सागरवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

आज श्रद्धांजली सभा

युवाशक्ती फाउंडेशनतर्फे अशोक सादरे यांना 19 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता काव्यर}ावली चौकात श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभा होणार आहे.

 

Web Title: Sagar Chaudhary's affair with Khadse family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.