रेल्वे महाव्यवस्थापकांकडून सुरक्षेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:13 IST2021-06-03T04:13:21+5:302021-06-03T04:13:21+5:30

भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन झाले असता, कन्सल यांनी स्थानकाच्या दक्षिणेकडील उद्यान, पार्किंगची पाहणी केली. यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरील कॅन्टीन, ...

Safety review by Railway General Manager | रेल्वे महाव्यवस्थापकांकडून सुरक्षेचा आढावा

रेल्वे महाव्यवस्थापकांकडून सुरक्षेचा आढावा

भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन झाले असता, कन्सल यांनी स्थानकाच्या दक्षिणेकडील उद्यान, पार्किंगची पाहणी केली. यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरील कॅन्टीन, प्रवासी प्रतीक्षालय तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या वातानुकूलीत विश्रामगृहाची पाहणी केली, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम दोन महिन्यात होणार पूर्ण

आपल्या दौऱ्याबाबत माहिती देताना कन्सल म्हणाले की, रेल्वेने सुविधांमध्ये कुठलीही कसर सोडली नाही. तिसऱ्या रेल्वे मार्गात भुसावळ ते भादली सुरू झाले असून, भादली ते जळगाव अपूर्ण आहे. मार्चपर्यंत कामासाठी मुदत देण्यात आली होती; मात्र कोरोनामुळे मजूर मिळत नसल्याने काम रखडले आहे. पुढील एक-दोन महिन्यात हे काम पूर्ण होईल, चौथ्या मार्गाचे काम मोठे असून, त्यास किमान वर्षभर तरी लागतील, असे डीआरएम विवेककुमार गुप्ता म्हणाले.

पादचारी पुलाच्या कामास येणार गती

रेल्वे स्थानकावरील जुन्या पादचारी पुलास तोडून त्याचे नूतनीकरण केले जात आहे. महिनाभरात काम पूर्ण होणार असल्याचे महाव्यवस्थापक यांनी सांगितले, तसेच प्रवाशांसाठी पर्यायी दादरा सुरू आहे. केवळ जुना पूल बंद करून, त्यावर नवीन पुलाची निर्मिती होत आहे. याचा फारसा परिणाम होत नसून, लवकरच त्याचेही काम पूर्ण होईल, असा विश्‍वास महाव्यवस्थापकांनी व्यक्त केला.

Web Title: Safety review by Railway General Manager