लाडकूबाई विद्यामंदिरात साधनाताई पाटील जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:23 IST2021-08-17T04:23:28+5:302021-08-17T04:23:28+5:30

यावेळी संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, डॉ. संदीप पाटील, सचिव डॉ. पूनमताई पाटील, प्रशांत पाटील, भाऊसाहेब सुरेश ...

Sadhanatai Patil Jayanti at Ladkubai Vidyamandir | लाडकूबाई विद्यामंदिरात साधनाताई पाटील जयंती

लाडकूबाई विद्यामंदिरात साधनाताई पाटील जयंती

यावेळी संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, डॉ. संदीप पाटील, सचिव डॉ. पूनमताई पाटील, प्रशांत पाटील, भाऊसाहेब सुरेश पाटील, जवाहर हायस्कूल गिरड शाळेचे स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन शिवाजीराव पाटील, सुभाष पाटील, सुकलाल भदाणे, मंगलताई पाटील, सुभाष निकम व संस्थेतील सर्व शाखांचे मुख्याध्यापक आणि इतर मान्यवर व विद्यालयाच्या प्राचार्या वैशाली पाटील, उपप्राचार्य ए. एस. पाटील व पर्यवेक्षक आर. डी. महाजन उपस्थित होते.

जवाहर हायस्कूल गिरड येथे प्राचार्य म्हणून एस. व्ही. शिंदे यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचादेखील सत्कार करण्यात आला. दीपक भोसले यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. सकाळ सत्रात साधनाताई प्रतापराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विज्ञान साधना प्रदर्शन ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनात जवळपास ७० विद्यार्थ्यांनी विविध नावीन्यपूर्ण मॉडेल्स तयार करून सहभाग नोंदविला. या विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून पाचोरा येथील विज्ञान शिक्षक वाय. आर. चौधरी यांनी काम पाहिले.

Web Title: Sadhanatai Patil Jayanti at Ladkubai Vidyamandir