एस आकाराचा अंजाळे घाट बनला मृत्यूचा सापळा
By Admin | Updated: December 31, 2015 00:17 IST2015-12-31T00:17:16+5:302015-12-31T00:17:16+5:30
भुसावळ : यावल-भुसावळ रस्त्यावरील इंग्रजी एस आकाराचा अंजाळे घाट मृत्यूचा सापळा ठरत आह़े

एस आकाराचा अंजाळे घाट बनला मृत्यूचा सापळा
भुसावळ : यावल-भुसावळ रस्त्यावरील इंग्रजी एस आकाराचा अंजाळे घाट मृत्यूचा सापळा ठरत आह़े अवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी येथे नित्याची बाब ठरल्याने वाहनधारकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आह़े नेहमीच होणा:या वाहतूक कोंडीमुळे या भागातून अवजड वाहनांना बंदी करण्याची मागणी पुढे आली आह़े घाटात गेला अनेकांचा बळी गेल्या काही महिन्यांत अपघाताची आकडेवारी पाहिल्यास थक्क होत़े विविध कारणास्तव झालेल्या अपघातात मयत झालेल्यांची संख्या लक्षणीय आह़े अनेकवेळा वाहने अडकल्याने वाहतूक भालोद-बामणोदमार्गे वळवण्याची वेळ आली आह़े अवजड वाहनांना बंदी हवी अंकलेश्वरकडून येत असलेली अवजड वाहने शिरपूरकडून चोपडा-यावलमार्गे वळविली जात आहेत. अंजाळे घाट एस आकाराचा असल्याने मोठी वाहने वळण घेऊ शकत नाही परिणामी ती जमिनीला टेकली गेल्याने घाटातच अडकून पडतात वा रस्त्यात आडवी होतात़, त्यामुळे वाहतुकीला खोळंबा होतो. अडकलेली वाहने वाहनधारक परस्पर क्रेनव्दारे काढून वाहतूक मोकळी करतात, असे नेहमीच घडत़े राज्यमार्गावरून 15 टन मालाची वाहतूक करण्याऐवजी तब्बल 30 ते 40 टन वजनाची वाहने माल घेऊन वाहतूक करतात, असे दिसून येते.