जोरदार पावसाअभावी पाझर तलावाच्या तोकड्या पाण्यात बैलांना अंघोळ घालण्यासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 17:07 IST2019-08-30T17:07:21+5:302019-08-30T17:07:37+5:30
कृषीप्रधान संस्कृतीतील महत्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा. या सर्जाराजाच्या सणानिमित्त सकाळी बैलांची अंघोळ घालायची लगबग येथील पाझर तलावाच्या कमी पाण्यात पहावयास मिळाली.

जोरदार पावसाअभावी पाझर तलावाच्या तोकड्या पाण्यात बैलांना अंघोळ घालण्यासाठी गर्दी
महिंदळे, ता.भडगाव, जि.जळगाव : कृषीप्रधान संस्कृतीतील महत्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा. या सर्जाराजाच्या सणानिमित्त सकाळी बैलांची अंघोळ घालायची लगबग येथील पाझर तलावाच्या कमी पाण्यात पहावयास मिळाली. परिसरात पावसाचे प्रमाण फारच कमी असल्यामुळे नाले, केटीवेअर कोरडेच आहेत. फक्त या पाझर तलावात थोडाफार पाणी साठा असल्यामुळे येथेच शेतकऱ्यांची लगबग दिसून आली.
यांत्रिकीकरणाच्या युगात शेतातील बैलांचा सहभाग कमी झाला असला तरीही शेतकऱ्यांना मातीतून सोने उगवणाºया सर्जाराजाचे स्थान अबाधित आहे. म्हणून या सच्चा मित्राचे कौतुक करण्याचा हा सण आजही ग्रामीण भागात तितक्याच उत्साहात साजरा करण्यात येतो. वर्षभर आपल्या धन्यासाठी राबराब राबणाºया सर्जाराजाला दोन दिवस विश्रांती असते. पोळ्याच्या पहिल्या दिवशी खान बैल म्हणजे बैलाच्या खांद्याला या दिवसापासून विश्रांती असते. या दिवशीही त्यांना अांघोळ घालून खांद्याला तेल लावण्यात येते. शेती कामे पूर्ण बंदच असतात. दिवसभर पोटभर चारा व संध्याकाळी सजवून वाजतगाजत मिरवणुकीनंतर पूजन व पुरणपोळीचे जेवण बैलांना देऊन या मानाच्या बैल पोळा सणांची सांगता होते.