नामनिर्देशनपत्र भरण्याकरिता इच्छुकांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:13 IST2020-12-23T04:13:39+5:302020-12-23T04:13:39+5:30
नशिराबाद : ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळीचा ज्वर वाढत असून, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याकरिता बुधवार, २३ डिसेंबरपासून सुरुवात होत असून, ३० डिसेंबरपर्यंत ...

नामनिर्देशनपत्र भरण्याकरिता इच्छुकांची धावपळ
नशिराबाद : ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळीचा ज्वर वाढत असून, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याकरिता बुधवार, २३ डिसेंबरपासून सुरुवात होत असून, ३० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. मात्र यादरम्यान २५ ते २७ असे सलग तीन दिवस सुट्टी असल्याने उमेदवारी दाखल करणाऱ्यांची मात्र धावपळ होणार आहे.
मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारला अनन्य महत्त्व आहे. शुक्रवार, २५ रोजी नाताळ, २६ रोजी चौथा शनिवार व २७ रोजी रविवारची सुट्टी येत आहे. यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ पाच दिवस राहणार आहे. त्यातही त्या दिवसाचा नाव, राशीप्रमाणे आपल्याला लाभलेला मुहूर्त, दिन, शुद्धी याचाही विचार इच्छुक उमेदवार करीत असल्याने दि. २४ व २९ डिसेंबर रोजी अनेक इच्छुकांची नामनिर्देशनपत्र दाखल करण्याकडे कल दिसत आहे.