शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात करावी लागते अहवालाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 11:07 IST

रुग्णांना माहितीही मिळेना : ‘अ‍ॅण्टीजन’चा मांडला बाजार, खासगी व्यवसायासाठी केला जातोय वापर?

जळगाव : कोरोनाचे अहवाल लवकर येऊन रुग्णांवर तत्काळ उपचार सुरू व्हावे व पुढील रुग्ण बरा व्हावा यासाठी तपासण्या वाढविताना प्रयोगशाळांचीही संख्या वाढविली. मात्र एवढ्या उपाययोजना करूनही ग्रामीण भागात अद्यापही वेळेवर अहवाल येत नसल्याचे चित्र आहे. असाच अनुभव जिल्ह्यात एका कुुटुंबाला आला असून तब्बल स्वॅब देऊन सहा दिवस झाले तरी त्यांना कळविण्यात आले नाही.इतकेच नव्हे घरातील इतर सदस्य तपासणीसाठी गेले असता अ‍ॅण्टीजन कीट असतानाही त्यांना माघारी पाठविण्यात आले. विशेष म्हणजे रुग्णांना कीट नसल्याचे सांगितले जात असताना या कीट संबंधितांकडून खाजगी व्यवसायासाठी वापर केला जात असल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे.जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग व मृत्यूदर पाहता याची थेट राज्यस्तरावर दखल घेतली गेली होती. त्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जळगावात येऊन येथील स्थितीचा आढावा घेतला.त्या वेळी मृत्यूदर कमी करणे व रुग्णांना तत्काळ उपचार मिळावे, यासाठी अहवाल २४ तासाच्या आत येण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. त्यानंतर जळगावातील कोरोना रुग्णालयातील प्रयोगशाळेची क्षमता वाढविण्यात आली. तसेच काही खाजगी प्रयोगशाळांशी करार करण्यात आला.गेल्या अनेक दिवसांपासून यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी ग्रामीण भागात अजूनही अहवाल लवकर येत नसल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहे. रुग्णांना स्थानिक पातळीवरच उपचार मिळावे, यासाठी तालुकापातळीवर स्वॅब घेणे व उपचार सुरू करण्यात आले. मात्र तरीदेखील या बाबत गांभीर्य नसल्याचे चित्र आहे.सहा दिवसानंतर कळविले तिसऱ्याच व्यक्तीनेजिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी एका जणाने आपल्या दोन्ही मुलांचे २३ आॅगस्ट रोजी तपासणीसाठी स्वॅब दिले. त्यानंतर एक-दोन दिवस अहवालाची प्रतीक्षा केली. मात्र अहवाल येतच नसल्याने ते निगेटिव्ह असतील, या विचाराने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र २९ रोजी सदर व्यक्तीला आरोग्य विभाग नव्हे तर तिसºयाच व्यक्तीने संपर्क साधून तुमच्या दोन्ही मुलांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे कळविले. त्या वेळी त्यांना धक्काच बसला. या सहा दिवसात ही मुले घरात त्यांचे आई, वडील, आजी यांच्यासह कॉलनीतील इतर जणांच्या संपर्कात आले. तसेच एवढा दिवसात मुलांना कोणतेही औषधोपचार न झाल्याने अधिकच भीती वाढली. दक्षता म्हणून संबंधितांनी घरातील सर्व सदस्य व कॉलनीतील इतर जण तपासणीसाठी गेले. त्या वेळी तेथे कीट कमी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे केवळ कॉलनीतील इतर जणांची तपासणी केली. त्यात सुदैवाने ते निगेटिव्ह आले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव