शहरं
Join us  
Trending Stories
1
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
2
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
3
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
4
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
5
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
6
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
7
ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
8
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
9
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
10
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
11
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
12
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
13
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
14
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
15
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
16
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
17
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
18
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
19
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
20
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!

तूर डाळीच्या भावात ६०० रुपयांनी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 12:25 IST

दोन आठवड्यांपासून मागणी घटल्याने सर्वच डाळींचे भाव कमी

जळगाव : कडधान्यावरील आयात बंदी, बाजारातील घटलेली आवक व मान्सून उशिरा येण्याच्या अंदाजाने कडाडलेल्या डाळींचे भाव गेल्या कमी- कमी होत आहे. यात तूर डाळीचे भाव दोन आठवड्यात ४०० ते ६०० रुपये प्रती क्विंटलने कमी झाले आहेत. सोबतच इतरही डाळींचे भाव २०० ते ३०० रुपये प्रती क्विंटलने घसरले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. बाजारपेठेत मागणी कमी होण्यासह वायदे बाजारही नियंत्रणात आल्याने हे भाव घसरत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे सुरुवातीपासून कडधान्याची आवक घटल्याने यंदा डाळींचे भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. त्यात सरकारने कच्च्या मालाच्या आयातीवर बंदी घातल्याने भाववाढीत आणखी भर पडली. त्यानंतरही डाळींची आवक घटत असल्याने बाजारपेठेत डाळींचे भाव दर आठवड्याला वाढतच गेले. त्यात भर म्हणजे पावसाळ््याच्या पार्श्वभूमीवर मान्सून लांबणार असण्याचा अंदाजदेखील डाळींच्या भाववाढीस कारणीभूत ठरत डाळींचे भाव मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सतत वाढत गेले. यात तूर डाळ तर ८९०० ते ९४०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली. ही डाळ प्रती किलो शंभरी गाठणार असे वाटत असतानाच मागणी कमी-कमी होत गेल्याने डाळींचे भाव घटत गेले.दोन आठवड्यांपासून दिलासादोन आठवड्यांपूर्वी ८९०० ते ९४०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या तूरडाळीचे भाव ८५०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. या सोबतच ८४०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात ८२०० ते ८६०० रुपये प्रती क्विंटल, उडीदाच्या डाळीचेही भावदेखील ६४०० ते ६८०० रुपये प्रती क्विंटलवरून ५९०० ते ६३०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. अशाच प्रकारे ६१०० ते ६५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. दोन आठवड्यांपासून डाळींचे भाव कमी-कमी होत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.तूर डाळीने वाढविली होती चिंतापावसाळा सुरू झाल्यानंतर उडीद-मूग आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यापर्यंत येऊ शकेल. मात्र नवीन तूर डिसेंबर-जानेवारीमध्ये येते. त्यामुळे ही तूर येण्यास सात ते आठ महिन्यांच्या कालावधी असल्याने तूर डाळीच्या भावात अधिक वाढ होत गेली व ती आणखी वधारण्याची चिन्हे होती. मात्र उन्हाळ््यात सुरू असलेली वर्षभराची धान्य खरेदीकमी झाल्याने डाळींची मागणी घटली व भाव कमी होण्यास यामुळे मदत झाली.सरकार स्थापनेचाही परिणामलोकसभा निवडणूक काळात सरकारचे बाजारपेठेवर नियंत्रण नसल्याने वायदे बाजाराच्या चलतीने बाजार पेठेत सर्वच वस्तूंचे भाव वाढत गेले. मात्र आता सरकार स्थापनेनंतर वायदेबाजारावर सरकारचे नियंत्रण आल्याने भाव वाढ थांबून डाळी, धान्याचे भाव कमी होत असल्याचेही सांगितले जात आहे.उन्हाळी धान्य व डाळ खरेदी कमी झाल्याने मागणी घटून दोन आठवड्यांपासून डाळींचे भाव कमी होत आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव