शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या दुचाकीचे हॅँडल निघाले; दगडावर आदळून बालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 11:52 IST

ममुराबादजवळ विचित्र अपघात

ठळक मुद्देचिंचोलीचे पती-पत्नी जखमीसुरक्षा रक्षक व फार्मासिस्ट नसल्याने वादाच्या घटना

जळगाव : धावत्या दुचाकीचे हॅँडल व शॉकअप निघाल्याने वडीलांच्या पुढे बसलेल्या पाच वर्षाचा बालक दगडावर आदळल्याने डोक्याला मार लागून जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी ममुराबाद गावापासून काही अंतरावर घडली. यज्ञेश जगन धनगर (वय ५) असे ठार झालेल्या बालकाचे नाव आहे. त्याचे वडील राजू जगन धनगर व आई माधुरी (मुळ रा.चिंचोली, ता.यावल, ह.मु.रायपुर, ता.जळगाव) असे जखमींची नावे आहेत.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, राजू धनगर हा तरुण रायपुर येथे वास्तव्याला असून महामार्गावर त्याचे कालिंका माता चौक परिसरात वाहन दुरुस्तीचे गॅरेज आहे. बुधवारी पत्नी माधुरी व मुलगा यज्ञेश याच्यासह मुळ गावी चिंचोली येथे दुचाकीने जात असताना ममुराबाद गावापासून पुढेधामणगाव रस्त्यावर अचानकपणे धावत्या दुचाकीचे हॅँडल व शॉकअप निघाले, त्यामुळे पुढे बसलेला यज्ञेश रस्त्याच्याकडेला असलेल्या दगडावर आदळला. कपाळाला जबर जखम झाल्याने तो जागेवरच गतप्राण झाला तर राजू व माधुरी यांच्याही डोक्याला मार लागला. रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी हा अपघात पाहताच तिघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.सुरक्षा रक्षक व फार्मासिस्ट नसल्याने वादाच्या घटनारात्रपाळीच्या ड्युटीत औषधांचे वाटप करण्यासाठी औषध निर्माता (फार्मासिस्ट) नसल्याने वादाच्या घटना घडतात.जिल्हा रूग्णालयात रात्री येणारा प्रत्येक रुग्ण गंभीर असतो. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक जण असतात. वेळेत उपचार मिळाला नाही तर वाद व मारहाणीच्या घटना घडतात. अशावेळी सुरक्षा रक्षकही नसतात. वारंवार पत्र देऊनही त्याची दखल घेतली नसल्याचे आपत्कालिन कक्षाच्या परिचारिका प्रमुख सुरेखा लष्करे यांनी सांगितले.उपचारावरुन उडाला गोंधळजिल्हा रुग्णालयात दाखल करताना तिघांवर एकाचवेळी उपचार करताना अडचणी निर्माण झाल्याने जखमींना दाखल करणाºया लोकांचा कर्मचाºयांशी वाद झाला. या वादात जखमींवर उपचारास विलंब होत होता. सुरक्षा यंत्रणा मात्र नावालाच होती. लहान मुलाला तपासले असता तो मृत झालेला होता. माझा एकुलता मुलगा आहे, त्याच्यावर उपचार करा असे आई, वडील सांगत असताना उपचार करणाºया डॉक्टर व परिचारिकांनाही गहिवरुन आले होते. वादविवाद झाल्यानंतर जखमींसोबत आलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले, त्यानंतर पती-पत्नीवर उपचार करण्यात आले. दोघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दरम्यान, पती-पत्नीचा आक्रोश पाहता मुलगा मृत झाल्याची माहिती त्यांना बराच वेळ देण्यात आली नाही. आपत्कालिन कक्षाच्या परिचारिका प्रमुख सुरेखा लष्करे यांनी त्यांना धीर देत नातेवाईकांना घटनेची माहिती दिली.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव