धावत्या रेल्वेतून तीन मोबाईलसह ३७ हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 19:35 IST2020-01-05T19:35:00+5:302020-01-05T19:35:24+5:30
अमळनेर स्थानकावरील घटना : दोन चेरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश

धावत्या रेल्वेतून तीन मोबाईलसह ३७ हजारांचा ऐवज लंपास
अमळनेर : येथील रेल्वे स्थानकावर धावत्या सुरत छापरा ताप्तीगंगा रेल्वगाडीत चाकूने वार करत तिघांनी चार प्रवाशांकडून तीन मोबाईल व रोख असा ३७ हजार रुपयांचा माल लुटला. ही घटना चार रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली. आरोपी रेल्वेतून उतरून पळालेल्या तिघांपैकी दोन आरोपींना पकडण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे.
सुरत छापरा ताप्तीगंगा एक्सप्रेसची अमळनेर रेल्वे स्थानकावर गती कमी झाली असता तिघे जण गाडीत चढले. एकाने चाकू मारून तसेच मारहाण करून राजस छदीलाल यादव, रा.पारसितपुर, उत्तरप्रदेश ह.मु. कडोद्रा, सुरत तसेच धुरेंद्र बलेश्वर महातो, गोलुकुमार भरत महातो रा.धरमपूर खैरा, जि.छापरा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच चाकूने मारहाण करून जखमी केले. त्यांच्याकडून तीन मोबाईल आणि खिशातील रोख १८ हजार ५०० रुपये असा एकूण ३७ हजार रुपयांचा माल लुटून लागलीच चालत्या गाडीतून उतरले. याबाबत नंदुरबार रेल्वे स्टेशनला लुटमारीचा गुन्हा दाखल झाला असून तपास पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हारे करीत आहेत. घटनेचे गांभीर्य पाहता लोहमार्ग औरंगाबादचे एलसीबीचे सहाययक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, पोलीस निरीक्षक दिलीप गढरी यांनी भेट देऊन संशयित आरोपींचे फोटो तक्रारदारांना दाखवून चौकशी केली. त्यानुसार गलवाडे रोडवरील तन्वीर शेख, राहुल पंढरीनाथ पाटील उर्फ रामजाने राकेश येवले हे तिन्ही आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी मधुकर विसावे, राजेंद्र गोराळे, महेंद्र पाटील आदींच्या मदतीने दोन्ही आरोपींचा मागोवा घेऊन तांबेपुरा रस्त्यावरील पुलाजवळ पकडले.
मुख्य आरोपी रामजाने व राकेश येवले हे दोघे संत सखाराम महाराज पुलाजवळ असल्याची माहिती दुपारी अडीच वाजेला मिळल्यानंतर पोलीस निरीक्षक गढरी, सपोनि नवघरे व पीएसआय जिव्हारे यांनी पाठलाग करून रामजानेला झडप घालून पकडले. त्याच्याजवळ कुकरी हत्यार आढळून आले. त्यावेळी त्याच्याकडून मोबाईल जप्त केले. मात्र राकेश नदीत पळून गेला.