यावल उपनगराध्यक्षपदी रुखमाबाई महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:46 IST2020-12-04T04:46:55+5:302020-12-04T04:46:55+5:30
यावल : येथील उपनगराध्यपदी रुखमाबाई नथ्थू महाजन या निवडून आल्या आहेत. त्यांनी नगरसेविका शे. ...

यावल उपनगराध्यक्षपदी रुखमाबाई महाजन
यावल : येथील उपनगराध्यपदी रुखमाबाई नथ्थू महाजन या निवडून आल्या आहेत. त्यांनी नगरसेविका शे. सईदाबी हारुन शेख यांचा पराभव केला आहे. पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार महेश पवार होते.
येथील उपनगराध्यक्ष राकेश कोते यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी गुरुवारी(दि.३) येथील पालिकेच्या सभागृहात तहसीलदार महेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी ऑनलाइन विशेष सभा आयोजित केली होती. तत्पूर्वी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या यावल शहर विकास आघाडीच्या रुखमाबाई महाजन व काँग्रेसच्या शे. सईदाबी शे. हारुन यांनी नामनिर्देशन दाखल केले होते. दोन्ही उमेदवारांचे अर्ज छाननीत मंजूर केल्यानंतर रुखमाबाई महाजन यांना ११, तर शे. सईदाबी यांना ८ मते मिळाली. तहसीलदार पवार यांनी महाजन यांची निवड घोषित केली. महाजन यांना माजी उपनगराध्यक्ष राकेश कोलते यांच्या श्री महर्षी व्यास शहरविकास आघाडीचे समर्थन मिळाले. दोनही गटांचे ११ नगरसेवक आहेत. निवडीनंतर रुखमाबाई महाजन यांचे तहसीलदार पवार, मुख्याधिकारी बबन तडवी, नगराध्यक्ष नौशाद तडवी, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, मावळते उपनगराध्यक्ष राकेश कोलते, प्रा. मुकेश येवले, नगरसेविका पौर्णिमा फालक, देवयान महाजन, रेखा चौधरी, कल्पना वाणी यांनी स्वागत केले.