सायगाव येथे मन्याड नदीचे रौद्ररूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:21 IST2021-09-09T04:21:05+5:302021-09-09T04:21:05+5:30

सलग तीन वर्षे मन्याड धरण भरत आहे. पण असे मन्याड धरणाने रौद्ररूप धारण केल्याचे १९८४ नंतर पहिल्यांदाच ग्रामस्थांना ‘याचि ...

Rudrarup of Manyad river at Saigaon | सायगाव येथे मन्याड नदीचे रौद्ररूप

सायगाव येथे मन्याड नदीचे रौद्ररूप

सलग तीन वर्षे मन्याड धरण भरत आहे. पण असे मन्याड धरणाने रौद्ररूप धारण केल्याचे १९८४ नंतर पहिल्यांदाच ग्रामस्थांना ‘याचि देही याचि डोळा’ पाहायला मिळाले. विशेष म्हणजे मंगळवारी दिवसभर पाण्याच्या पातळीत काहीच वाढ नव्हती. संध्याकाळी नांदगाव तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आणि मध्यरात्री १ ते २ वाजेच्या सुमारास हा पूर आल्याचे समजते.

हा पूर इतका भयानक होता की, मन्याड नदीमधून विजेच्या तारा गेल्या आहेत. बरोबर डी.पी.देखील वाहून गेला आहे. मध्यरात्री ३ वाजेपासून संपूर्ण गाव अंधारात आहे व गावात पाणी घुसल्याने नव्या गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. जर गिरणा धरण १०० टक्के भरले असते तर सायगाव परिसरांतील सर्व गावांना धोका निर्माण झाला असता, अशी चर्चा होत होती.

आता सध्या ६० ते ७० हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग मन्याड धरणातून होत आहे. अजून जर पाण्याची रिपरिप सुरूच राहिली तर मन्याड धरणाच्या पातळीत वाढ होईल, म्हणून प्रशासनाने जागरूक व सावध राहावे, असा इशारा दिला आहे. रस्त्यात बसस्टॅन्डवर जिकडे तिकडे गर्दीच गर्दी होती. अधूनमधून पोलीस व्हॅनचे सायरन वाजत होते. त्यामुळे गर्दी जास्त जमा झाली होती.

080921\08jal_3_08092021_12.jpg

मन्याड नदीने रौद्ररूप धारण केले. (छाया : गोकुळ मंडळ, सायगाव)

Web Title: Rudrarup of Manyad river at Saigaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.