शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

लॉकडाऊनमुळे आरटीओचा महसूल झाला ‘लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 12:35 IST

तीन महिन्यात कोट्यवधीचा फटका : वार्षिक उद्दीष्टात ६ टक्के घट

सुनील पाटील ।जळगाव : राज्यात सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या विभाग म्हणून आरटीओकडे पाहिले जाते. मात्र लॉकडाऊनमुळे वाहन व आॅटोमोबाईल क्षेत्रही बंद झाल्याने त्याचा सर्वाधिक फटका या विभागाला बसला आहे. तीन महिन्यात राज्याला एक हजार कोटीचा महसूल मिळणे अपेक्षित असताना तो फक्त शंभर कोटी रुपये मिळाला आहे. जळगाव आरटीओला मोठा फटका बसला असून वार्षिक उद्दीष्टातही ६ टक्के घट झाली आहे.अजूनही राज्यात लॉकडाऊन असून जळगाव शहरातही कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आरटीओचा कारभार व महसूल हा वाहन नोंदणी, पसंती क्रमांक, वाहन परवाना व रस्त्यावर धावणाºया वाहनांवर कारवाया यावरच अवलंबून आहे. २४ मार्च रोजी देशभरात जनता संचारबंदी लागू झाली, त्यानंतर देशभरात लॉकडाऊन लागू झाला. टप्प्याटप्प्याने हा लॉकडाऊन वाढविण्यात येत असून तो आजही कायम आहे. त्याचा परिणाम हा आरटीओच्या महसुलावर होत आहे. महसुल मिळवून देण्याच्या बाबतील जळगाव आरटीओचा क्रमांक पहिल्या दहामध्ये असतो.गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ, मात्र उद्दीष्टात घट२०१८-१९ या वर्षीत जळगाव आरटीओ १२३ कोटी ७१ लाखाचे उद्दीष्ट देण्यात आले होते, त्यात या विभागाने १२४ कोटीचा महसूल मिळविला होता. २०१९-२० या आर्थिक वर्षात १३१ कोटी १९ लाखाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यात १२४ कोटी ९४ लाखाचे उत्पन्न या विभागाने दिले. २०१८-१९ च्या तुलनेत महसुलात वाढ झाली असली तरी उद्दीष्टात ६ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. भरारी पथकाला ५ कोटी महसुलाचे उद्दीष्ट होते, या पथकाने १२५ टक्के काम केले. ६ कोटी ५९ लाखाचा महसूल या पथकाने मिळवून दिला.परवाना, परमीट व फिटनेसला मुदतवाढलॉकडाऊन काळात जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी ज्या व्यक्तींच्या वाहन, परमीट व फिटनेस यांची १ फेब्रुवारी रोजी मुदत संपलेली आहे, अशांना ३० सप्टेबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी ‘लोकमत’ ला दिली. लर्निंग लायन्सस, कायमस्वरुपीचे लायसन्सधारक यांचा समोवश आहे.फिटनेस नसलेल्या ४ हजार वाहनांवर कारवाईआरटीओच्या पथकाने वेळोवेळी राबविलेल्या मोहिमेत योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) नसलेल्या ३ हजार ८८५ वाहनांवर तर ओव्हरलोड वाहतूक करणाºया ४३० वाहनांवर कारवाई केलेली आहे. त्याशिवाय क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक करणाºया १ हजार १३० व अवैध प्रवाशी वाहतूक करणाºया १ हजार ३८२ वाहनांवर कारवाई केलेली आहे. नियमांचे उल्लंघन करणाºया ९१३ वाहनांची नोंदणी निलंबित केलेली आहे.लॉकडाऊनमुळे वाहन उत्पादन, नोंदणी व खरेदी बंद असल्याने त्याचा परिणाम आरटीओच्या महसुलावर झालेला आहे. बाहेर रस्त्यावरील वाहनेही बंद असल्यामुळे कारवायांची मोहीम थांबली होती. त्याचा देखील परिणाम झाला आहे. या तीन महिन्यातच महसुलात मोठी घट झाली आहे. उद्दीष्टपुर्ती ६ टक्क्यानी कमी झालेली आहे, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत महसुलात वाढ झाली आहे. लॉकडाऊन असेच राहिले तर आणखी फटका बसेल.-श्याम लोही, उपप्रादेशिक परिवहन अधिकारीफिटनेस नसलेल्या ४ हजार वाहनांवर कारवाईआरटीओच्या पथकाने वेळोवेळी राबविलेल्या मोहिमेत योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) नसलेल्या ३ हजार ८८५ वाहनांवर तर ओव्हरलोड वाहतूक करणाºया ४३० वाहनांवर कारवाई केलेली आहे. त्याशिवाय क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक करणाºया १ हजार १३० व अवैध प्रवाशी वाहतूक करणाºया १ हजार ३८२ वाहनांवर कारवाई केलेली आहे. नियमांचे उल्लंघन करणाºया ९१३ वाहनांची नोंदणी निलंबित केलेली आहे.फिटनेस नसलेल्या ४ हजार वाहनांवर कारवाईआरटीओच्या पथकाने वेळोवेळी राबविलेल्या मोहिमेत योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) नसलेल्या ३ हजार ८८५ वाहनांवर तर ओव्हरलोड वाहतूक करणाºया ४३० वाहनांवर कारवाई केलेली आहे. त्याशिवाय क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक करणाºया १ हजार १३० व अवैध प्रवाशी वाहतूक करणाºया १ हजार ३८२ वाहनांवर कारवाई केलेली आहे. नियमांचे उल्लंघन करणाºया ९१३ वाहनांची नोंदणी निलंबित केलेली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव