250 रुपयांसाठी तरूणाला धावत्या रेल्वेतून फेकले
By Admin | Updated: March 28, 2017 18:23 IST2017-03-28T18:23:21+5:302017-03-28T18:23:21+5:30
रेल्वे प्रवासा दरम्यान तरुणाकडील 250 रुपये व मोबाईल हिसकावून त्याला धावत्या रेल्वेतून फेकल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.

250 रुपयांसाठी तरूणाला धावत्या रेल्वेतून फेकले
भागलपूर-सुरत तात्पीगंगा एक्स्प्रेसमधील प्रकार : जखमी अवस्थेत तरूण पोहचला रिक्षा स्टॉपवर
जळगाव : भागलपूर-सुरत तात्पीगंगा एक्स्प्रेसने ब:हाणपूर येथून जळगाव येथील काकांकडे येत असलेल्या साबीर शेख जुम्मा वय- 20 रा़ लालबाग, ब:हाणपूर या तरूणाला दहा ते बारा जणांनी मारहाण करत 250 रूपये तसेच मोबाईल हिसकावून त्याला धावत्या रेल्वेतून फेकून दिल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास ममुराबाद नाक्याजवळ रेल्वे लाईनवर घडली़ जखमी अवस्थेत तरूणाने रिक्षातून खंडेराव येथील काकांचे घर गाठल़े व आपबीती कथन केली़ डोक्याला, तोंडाला गंभीर दुखापत झाली असून जिल्हा रूग्णालयात साबीरवर उपचार सुरू आहेत़
साबीर शेख हा लालबाग येथील उर्दू शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आह़े आई-वडील, भाऊ व बहीण असा त्याचा परिवार आह़े वडील ब:हाणपूर रेल्वे स्थानकावर शितपेये विक्रीचे दुकान लावतात़ तर मोठा भाऊ सलमान हा सौदी येथे कामाला आह़े साबीर हा त्याचे जळगावातील खंडेराव नगर येथील काका शेख रहेमान शेख रसरूल काका यांची भेट घेण्यासाठी सकाळी तात्पीगंगा एक्स्प्रेसने ब:हाणपूर रेल्वेस्थानकावरून तात्पीगंगा एक्स्प्रेसमध्ये बसला होता.