जळगावातील आर.आर. विद्यालयाचे मुख्याध्यापक निलंबित
By Admin | Updated: July 8, 2017 17:55 IST2017-07-08T17:55:36+5:302017-07-08T17:55:36+5:30
ईस्ट खान्देश सोसायटीच्या कार्यकारी मंडळाच्या सभेचे आयोजन 3 जुलै रोजी करण्यात आले होते.

जळगावातील आर.आर. विद्यालयाचे मुख्याध्यापक निलंबित
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि.8 - ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित आर.आर.विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.एस.सरोदे यांना निलंबन करण्यात आले आहे. याबाबतचा निर्णय संस्थेने घेतला आहे.
ईस्ट खान्देश सोसायटीच्या कार्यकारी मंडळाच्या सभेचे आयोजन 3 जुलै रोजी करण्यात आले होते. या बैठकीत संस्थाध्यक्ष अरविंद लाठी, अविनाश लाठी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी हा निर्णय घेण्यात आला.