शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

राजेशाही वारसाला राजाश्रयाची साथ : ‘भगदरी’ बदलतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 01:09 IST

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अति दुर्गम भागातील भगदरी हे गाव राज्यपालांनी दत्तक घेतले आहे. या गावाला राज्यपालांनी नुकतीच भेट दिली. त्याविषयी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत अभ्यासक, ‘लोकमत’चे मुख्य उपसंपादक रमाकांत पाटील..

‘भगदरी...’ सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील गाव. एकेकाळी या गावात राजवैभव नांदत होते. मात्र राजेशाही संपुष्टात आल्यानंतर या गावातील राजवैभवही विस्मृतीला गेले. पण सध्या राज्यात हे गाव पुन्हा चर्चेत आले आहे. कारण चार वर्षापूर्वी खुद्द राज्यपालांनीच हे गाव दत्तक घेतले आहे. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात राज्यपालांनी तेथे भेट देऊन पाहणी केल्याने गाव भौतिक सुविधांनी चकाकले आहे.सातपुड्यातील अक्कलकुवा तालुक्यातील काठी संस्थान हे सर्वात मोठे संस्थानिकांचे गाव होते. या संस्थानचे कार्यक्षेत्र एक लाख २२ हजार २४७ चौरस किलोमीटर होते. याच संस्थानअंतर्गत भगदरी हेदेखील संस्थानिकांच्या वारसदारांचे गाव होते. १८४६ च्या कायद्यानुसार हे संस्थान कार्यरत होते. परंतु १९६१ मध्ये सर्वच संस्थान खालसा करण्याचा कायदा झाला. त्याद्वारे काठी संस्थानही खालसा झाले. मात्र दसरा व इतर सणाला या गावाचे राजेशाही वैभव आजही पहायला मिळते.मोलगी या मोठ्या बाजारपेठेच्या ठिकाणापासून जेमतेम सात किलोमीटरवर भगदरी हे गाव. या गावाला जाण्यासाठी २१ व्या शतकाच्या सुरुवातीलाच डांबरी रस्ता झाला. सध्या हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. परंतु राज्यपालांच्या दौऱ्यामुळे त्याची मलमपट्टी करण्यात आली आणि खड्ड्यात मुरूम-माती भरून गुळगुळीत करण्यात आला आहे. या गावात शासकीय आश्रमशाळा आहे. अंगणवाडी आहे. पशुवैद्यकीय दवाखाना आहे. आरोग्य उपकेंद्राच्या सुविधा आहेत. चार वर्षांपूर्वी गावात चांगली इमारत नव्हती. पण राज्यपालांनी दत्तक घेतल्यानंतर सर्वच शासकीय कार्यालयांच्या इमारती येथे कार्यरत झाल्या आहेत. नव्हे तर तब्बल एक कोटी रुपये खर्चाचे सांस्कृतिक भवनही बांधण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन चार दिवसांपूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. याठिकाणी बीएसएनएलचा टॉवरही उभारण्यात आला आहे.राज्यपालांनीच गाव दत्तक घेतल्याने सर्वच शासकीय यंत्रणा येथे कार्यान्वित झाल्याने विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी गावात झाली आहे. साहजिकच सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील गावांपेक्षा हे गाव वेगळे आहे. इतर गावातील जनतेच्या नशिबी असलेल्या हालअपेष्टा, समस्या या गावात त्या तुलनेत कमी आहेत. तरीही राज्यपालांसमोरच लोकांनी अनेक समस्यांचा पाढा वाचला. त्यात वीज आणि मोबाईल सेवेचे आश्चर्यजनक समस्या ऐकायला मिळाल्या. गावात घराघरापर्यंत वीज मीटर पोहोचले पण वीज मात्र नाही. बीएसएनएलचे लक्षवेधी टॉवर गावात प्रवेश करताच सर्वांचे लक्ष वेधते पण नेटवर्क मात्र नाही. राज्यपालदेखील या समस्या ऐकून चकीत झाले नाही तर नवल. पण त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कालबद्ध कार्यक्रम देऊन या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.एकूणच गेल्या पाच वर्षात या गावात सांस्कृतिक भवन, पशुवैद्यकीय दवाखाना, आरोग्य उपकेंद्र या इमारतींसह परिसरातील जोडरस्त्यांच्या कामांवर १६ कोटींहून अधिक खर्च झाले आहेत.साहजिकच गावातील भौतिक विकासाची चकाकी वाढली आहे. त्यामुळे हे गाव सातपुड्यातील दुर्गम गावांपेक्षा वेगळे गाव ठरत आहे. आता या गावाचा हेवा इतर गावांनाही वाटू लागल्याने माय-बाप सरकारने या गावांकडेही लक्ष घालावे किंवा राज्यपालांनी आमचेही गाव दत्तक घ्यावे, असा सूर आसपासच्या गावातून व्यक्त होऊ लागला आहे.१९४२ साली आमच्या गावात तेव्हाचे बॉम्बे गव्हर्नर राजर लुमली व लेडी लुमली हे भगदरीला आले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये आताचे राज्यपाल आले. त्यांना आम्ही तेव्हाच्या गव्हर्नरने चिप्टनसोबत काढलेला फोटो भेट दिला आहे. भगदरी हे गाव राज्यपालांनी दत्तक घेतल्यामुळे गावात रस्ते, वीज व इतर सुविधा होत आहेत. परंतु अजूनही अनेक सोयी-सुविधा गावात उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे संस्थानिकांचे वारसदार अ‍ॅड.भगतसिंग पाडवी नमूद करतात.-रमाकांत पाटील, नंदुरबार

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव