कुजलेले प्रेत विहिरीतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:20 IST2021-09-07T04:20:03+5:302021-09-07T04:20:03+5:30
अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर : अंतुर्ली शिवारातील वारोली रस्त्यावरील शेतातील पायविहिरीत कुजलेल्या अवस्थेत एका अनोळखी इसमाचे प्रेत सोमवार आढळून आल्याने ...

कुजलेले प्रेत विहिरीतून
अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर : अंतुर्ली शिवारातील वारोली रस्त्यावरील शेतातील पायविहिरीत कुजलेल्या अवस्थेत एका अनोळखी इसमाचे प्रेत सोमवार आढळून आल्याने पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक परवीन तडवी हे तपास करीत आहेत.
आठ - दहा दिवसांपासून प्रेत विहिरीत असल्याने परिसरात दुर्गंधी येत असल्याने शेतमालक अनिल पारख यांनी पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक तडवी व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. दुर्गंधी येत असल्याने प्रेत विहिरीतून काढण्यास कोणी तयार होत नव्हते. प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष विलास पांडे यांनी त्यांचे कार्यकर्ते वैभव व रोशन बेलदार यांना विनंती केल्याने त्यानी विहिरीत उतरून प्रेत बाहेर काढले. शवविच्छेदन जागेवरच करण्यात आले.
खूपच दुर्गंधी येत असतानासुद्धा प्रेत विहिरीतून बाहेर काढण्याचे धाडस दाखवल्याबद्दल विलास पांडे व पोलिसांकडून पोलीस स्टेशनच्या आवारात तरुणांचा सत्कार करण्यात आला.
कुजलेले प्रेत विहिरीतून काढणाऱ्या तरुणांचा सत्कार करताना विलास पांडे, पोलीसपाटील किशोर मेंढे आदी.