रोटरी क्लबतर्फे कोकण पूरग्रस्तांना तातडीची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:16 IST2021-07-29T04:16:36+5:302021-07-29T04:16:36+5:30

पाचोरा येथील राजे संभाजी युवा फाउंडेशन प्रणित ‘आधारवड’ या संस्थेच्या मदतीने हा उपक्रम राबवण्यात आला. आधारवड संस्था ता. २९ ...

Rotary Club provides emergency assistance to Konkan flood victims | रोटरी क्लबतर्फे कोकण पूरग्रस्तांना तातडीची मदत

रोटरी क्लबतर्फे कोकण पूरग्रस्तांना तातडीची मदत

पाचोरा येथील राजे संभाजी युवा फाउंडेशन प्रणित ‘आधारवड’ या संस्थेच्या मदतीने हा उपक्रम राबवण्यात आला. आधारवड संस्था ता. २९ रोजी चिपळूण येथे जाऊन पूरग्रस्तांना ही मदत सुपूर्द करणार आहे.

रोटरी क्लबतर्फे देण्यात आलेल्या फुड पॅकेट्समध्ये आटा, गोडे तेल, तांदूळ, तूर डाळ, साखर, चहा आदी अत्यावशक चीज वस्तूंचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा येथे रोटरी क्लबतर्फे आधारवडच्या युवा पदाधिकाऱ्यांकडे ही सर्व अन्न पाकिटे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण पाटील, सचिव प्रा. पंकज शिंदे, उपप्रांतपाल राजेश बाबूजी मोर, चंद्रकांत लोडाया, डॉ. अमोल जाधव, डॉ. गोरख महाजन, शिवाजी शिंदे, नीलेश कोटेचा व आधारवडचे प्रतिनिधी भूषण देशमुख, प्रवीण पाटील, महेंद्र रायगडे, राहुल पाटील, रवींद्र देवरे आदी उपस्थित होते.

Web Title: Rotary Club provides emergency assistance to Konkan flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.