रोटरी क्लबतर्फे १८ शिक्षकांचा नेशन बिल्डर अवॉर्डने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:20 IST2021-09-24T04:20:03+5:302021-09-24T04:20:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चोपडा : यशवंत एक शोधायचा असला तर लाख भेटतात, मात्र गुणवंत लाखात हजार दोन हजार ...

रोटरी क्लबतर्फे १८ शिक्षकांचा नेशन बिल्डर अवॉर्डने सन्मान
लोकमत न्यूज नेटवर्क
चोपडा : यशवंत एक शोधायचा असला तर लाख भेटतात, मात्र गुणवंत लाखात हजार दोन हजार किंवा पाच हजारांनी भेटतात. आजच्या समाजाची मूळ एचडी बदललेली आहे. आत्ताची वेळ आणीबाणीची आहे. हे नैराश्य नाही. कारण ३५ वर्षांपूर्वीचा आणि आजचा तरुण याच्यात खूप बदल जाणवत आहे. यात शिक्षक म्हणून माझी चूक आहे का, हे प्रत्येकाने शोधलं पाहिजे, असे प्रतिपादन अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री तथा नॅनो टेक्नॉलॉजी संशोधक डॉ. एल. ए. पाटील यांनी चोपडा येथे केले.
ते रोटरी क्लब चोपडातर्फे शिक्षकांना नेशन बिल्डर अवाॅर्ड सन्मान कार्यक्रमात बोलत होते.
व्यासपीठावर रोटरीचे माजी प्रांतपाल एम. डब्ल्यू. पाटील, रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले, मानद सचिव प्रवीण मिस्त्री, गौरव महाले, मुख्याध्यापक विलास पाटील, पंकज शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले आदी उपस्थित होते.
शिक्षकांच्या कार्याचा राष्ट्राच्या उभारणीमध्ये मोलाचा वाटा आहे. शिक्षकांच्या या कार्याची दखल घेऊन रोटरी क्लबकडून तालुक्यातील विविध शाळेतील १८ शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. त्यासोबतच इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या परीक्षेत शाळेतून प्रथम येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख विलास पाटील आणि गौरव महाले, चोपडा रोटरी क्लबचे अध्यक्ष पंकज बोरोले व मानद सचिव प्रवीण मिस्त्री, बी.एस. पवार आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक राधेश्याम पाटील यांनी केले.