रोटरॅक्ट रिप्रेझेंटेटिव्ह पदग्रहण समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:19 IST2021-08-26T04:19:30+5:302021-08-26T04:19:30+5:30
भुसावळ : डिस्ट्रिक्ट रोटरॅक्टमध्ये काम केल्याने तरुणांना वेगळी दिशा मिळत असल्याचे प्रतिपादन डिस्ट्रिक्ट ३०३०चे प्रांतपाल रमेश मेहेर ...

रोटरॅक्ट रिप्रेझेंटेटिव्ह पदग्रहण समारंभ
भुसावळ : डिस्ट्रिक्ट रोटरॅक्टमध्ये काम केल्याने तरुणांना वेगळी दिशा मिळत असल्याचे प्रतिपादन डिस्ट्रिक्ट ३०३०चे प्रांतपाल रमेश मेहेर यांनी केले. रोटरी भवनात डिस्ट्रिक्ट रोटरॅक्ट रिप्रेझेंटेटिव्ह पदग्रहण समारंभ झाला. त्यात ते मार्गदर्शन करीत होते.
यावेळी माजी प्रांतपाल राजीव शर्मा, इनरव्हीलच्या प्रांत अध्यक्षा अश्विनी गुजराथी, सेरीक एमडीआयओचे अध्यक्ष कौशल साहू, डॉ. रश्मी शर्मा, उमेश नेमाडे, सुहास अग्रवाल, संजू भटकर, जी. आर. ठाकूर, राजेंद्र फेगडे, डॉ. सुधीर शर्मा, आदिलखान, जीवन महाजन, राजेंद्र यावलकर, मुकेश प्रतापसिंग, शंतनू अग्रवाल, संगीता पाटील, प्रसन्न गुजराथी आदी उपस्थित होते.
प्रांतपाल मेहेर यांनी डीआरआर लोकेश कांसल यांना अध्यक्षपदाची, तर पूर्वेश मोकाळकर यांना सेक्रेटरी पदाची पिन देऊन पदभार दिला. लोकेश कांसल यांच्या रोटरॅक्टमधील प्रवासाबाबतची माहिती वेदश्री फालक व काजल कांसल यानी करून दिली. अपूर्वा फेगडे व रिया चांदवानी यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी किशोरकुमार पाचपांडे यांचे सहकार्य लाभले.
डिस्ट्रिक्ट रोटरॅक्टमध्ये यांचे झाले पदग्रहण
डीआरआर लोकेश कांसल, डीआरटी शंतनू अग्रवाल, फाऊंडेशन कमिटी चेअर अभिषेक गोयल, कोट्रेनर सनईल अहमद, सेक्रेटरी पूर्वेश मोकाळकर, ट्रेझरर प्रतीक चौधरी, जॉईन्ट ट्रेझरर सलोनी भगवानी, एआयडी नीलेश चौधरी, एडीआरआर आशिष निकम, प्रीतमसिंग, सचिन पुरवार, क्रिष्णा सिंग, भावेश कुंभारे, समित यावलकर, पियुष अंधारे, करण गडोडीया, अभिषेक पवार, विराज पहाडे, पारिजात येवले, सौरभ, जरीयल, अपूर्व हुमने, नंदिनी रबरा, ओम महाजन, गुणवंत नारखेडे, मयुरी घनगरे, हिमांशु त्रिपाठी, हरगुनसिंग कोछार, अभिषेक अग्रवाल, गौरव वाल्मिक, दिया शहा, साहील फाडके, निशिगंधा उपासनी.
रोटरॅक्ट क्लब ऑफ ताप्ती व्हॅलीमध्ये यांचे झाले पदग्रहण
अध्यक्ष डॉली दुधानी, सचिव व्टिंकल परदेशी, कोषाध्यक्ष महिमा जैन, डायरेक्टर अपूर्वा फेगडे, वेदश्री फालक, हर्षल वानखेडे, निखिल बोंडे, सचिन ललवाणी, सुमित यावलकर.