छत व गज कापून दीड लाख लांबविले
By Admin | Updated: September 27, 2015 00:09 IST2015-09-27T00:09:05+5:302015-09-27T00:09:05+5:30
शहर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डॉ.मुखर्जी उद्यानाला लागून असलेल्या वसंत भावसार यांच्या मालकीच्या दुकानाचे छत व गज कापून दीड लाख रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याची घटना उघडकीस आली.

छत व गज कापून दीड लाख लांबविले
जळगाव : शिव कॉलनीतील घरफोडीची घटना शनिवारी पुन्हा शहर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानाला लागून असलेल्या वसंत भावलाल भावसार (वय 62) रा.बळीराम पेठ यांच्या मालकीच्या दुकानाचे छत व गज कापून त्यातील दीड लाख रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मुखर्जी उद्यानाच्या भींतीला लागून भावसार यांचे भाई भाई जनरल स्टोअर्स या नावाने दुकान आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरटय़ांनी दुकानाच्या छतावरील पत्रा कापून आतमध्ये प्रवेश केला. गल्लय़ातील दीड लाख रुपयाची रोकड चोरुन नेली. सकाळी दुकान उघडण्यास गेले असता हा प्रकार लक्षात आला. दरम्यान, चोरीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक नवलनाथ तांबे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दोन दिवसापूर्वी शिव कॉलनीतील नरेंद्र कुळकर्णी यांच्या घरातून 30 हजार रुपये रोख व 17 हजार रुपये किमतीचा एलसीडी बुचडाधारी चोरटय़ाने लांबविला होता. त्यानंतर डॉ. मुखर्जी उद्यानाजवळ ही घटना घडली. दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा चोरीचे सत्र सुरू झाल्याने पोलीस दलासमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे.