मानसिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी शैक्षणिक संस्थांची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 08:37 PM2019-09-22T20:37:20+5:302019-09-22T20:37:27+5:30

डॉ.माहुलीकर : एरंडोल महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम

The role of educational institutions is important in strengthening mental health | मानसिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी शैक्षणिक संस्थांची भूमिका महत्त्वाची

मानसिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी शैक्षणिक संस्थांची भूमिका महत्त्वाची

googlenewsNext





एरंडोल : शैक्षणिक संस्थांनी केवळ पारंपरिक शिक्षणक्रमास प्राध्यान्य न देता समाजाभिमुख उपक्रम राबवावेत, ज्यात सुदृढ मानसिक आरोग्य आणि मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी जाणीपूर्वक प्रयत्न केले जावेत. हेच नवीन शैक्षणिक धोरणात अपेक्षित असल्याचे मत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पी.पी. माहुलीकर यांनी व्यक्त केले.
एरंडोल येथील दादासो. दिशंबर शंकर पाटील महाविद्यालयात २० सप्टेंबर रोजी मानसिक स्वास्थ्य, मानसिक आजार व त्यावरील उपचार या विषयावर पोस्टर सादरीकरण स्पर्धा आयोजित केली होती. त्यात उद्घाटनपर संबोधनात प्रा.माहुलीकर बोलत होते. मानसिक आरोग्यावर आधारित एका नव्या व अभिनव उपक्रमाची सुरुवात एरंडोल महाविद्यालयाने केली म्हणून त्यांनी प्राचार्य आणि संस्थेचे अभिनंदन केले.

मानसिक आरोग्यासाठी विद्यार्थ्यांचे सांघिक प्रयत्न
मानसिक आरोग्यावर आधारित या पोस्टर स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव परिक्षेत्रातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील २२ महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. पदवी गटातून ४० आणि पदव्युत्तर गटातून १९ असे ५९ पोस्टर्स लावण्यात आले होते.

स्पर्धेचे उद्घाटन कबचौ उमविचे प्र-कुलगुरु प्रा. डॉ. माहुलीकर यांच्या हस्ते फित कापून झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अमीत पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डी.आर.पाटील, माधवराव पाटील, आनंदराव पाटील, हे होते. व्यासपीठावर डॉ. श्री. शरद पाटील, मा. श्री. जगदिश पाटील, प्रा. एस. पी. पाटील, प्रा. एस. एम. पवार प्रा. डॉ. सी. पी. लभाणे, सुप्रसिध्द मनोचिकित्स मा. डॉ. प्रदिप जोशी, सुप्रसिध्द समाजसेवक व आशा फाऊंडेशन, जळगावं चे प्रमुख मा. गिरीष कुळकर्णी व मानसशास्त्रज्ञ सौ. वीना महाजन, मानसशास्त्र अभ्यासमंडळाचे अध्यक्ष गोकुळ चौधरी, समन्वयक व उपप्राचार्य.डॉ. अरविंद बडगुजर हे होते. दुपारच्या सत्रात परिक्षणानंतर परिक्षकांनी स्पधेर्चा निकाल जाहिर केला व नंतर विजेत्या स्पर्धकांना एरंडोल शहराचे नगराध्यक्ष मा. श्री. रमेश परदेशी तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

Web Title: The role of educational institutions is important in strengthening mental health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.