अशी कामगिरी करणारा रोहित ठरला पहिला फलंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:20 IST2021-09-24T04:20:57+5:302021-09-24T04:20:57+5:30

त्याच्या नंतर सनरायजर्सचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने केकेआर विरोधात आतापर्यंत ९१५ धावा फटकावल्या. डेव्हिड वॉर्नर यानेच पंजाब किंग्ज विरोधात ...

Rohit became the first batsman to do so | अशी कामगिरी करणारा रोहित ठरला पहिला फलंदाज

अशी कामगिरी करणारा रोहित ठरला पहिला फलंदाज

त्याच्या नंतर सनरायजर्सचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने केकेआर विरोधात आतापर्यंत ९१५ धावा फटकावल्या. डेव्हिड वॉर्नर यानेच पंजाब किंग्ज विरोधात ९४३ धावा केल्या आहेत. तर विराटने दिल्ली कॅपिटल्सविरोधात ९०९ धावा केल्या आहेत. एक हजार धावा पूर्ण करणारा रोहित हा पहिला फलंदाज ठरला.

रोहितने या सामन्यात ३० चेंडूत चार चौकारांसह ३३ धावा केल्या. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत २०८ सामन्यांत ५५१३ धावा केल्या आहेत.

रोहित शेर, तो नरेन सव्वाशेर

रोहित याने केकेआरविरोधात १ हजार धावांचा टप्पा गाठला खरा; पण नरेन याने लाँग ऑनला सीमारेषेच्या काही अंतर पुढे त्याला शुभमन गीलकरवी झेल बाद केले. नरेन याने आयपीएलमध्ये सात वेळा रोहित शर्माला बाद केले आहे. याबाबतीत त्याने भारताचा जलदगती गोलंदाज जहीर खान आणि संदीप शर्मा यांची बरोबरी केली आहे. जहीर याने सात वेळा धोनीला बाद केले आहे. तर संदीप याने आरसीबीचा कर्णधार विराट कोहली याला सात वेळा तंबूत पाठवले आहे. या दोन्ही गोलंदाजांच्या कामगिरीची बरोबरी नरेन याने आज केली.

Web Title: Rohit became the first batsman to do so

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.