विजया बँकेवर दरोडा, गोळीबारात शाखा उपव्यवस्थापक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 18:17 IST2019-06-18T15:24:31+5:302019-06-18T18:17:33+5:30
रावेर तालुक्यातील निंबोल येथील भर दुपारची घटना

विजया बँकेवर दरोडा, गोळीबारात शाखा उपव्यवस्थापक ठार
रावेर (जि. जळगाव) : तालुक्यातील निंबोल येथील विजया बँकेच्या शाखेवर मंगळवारी दुपारी बँक सुरु असताना दरोडा पडला. यावेळी दरोडेखोरांनी बँकेचे शाखा उपव्यवस्थापक करनसिंग नेगी यांच्यावर गोळीबार केला. यात ते ठार झाले. त्यांना छातीत दोन गोळ्या लागल्या. पहिली गोळी लागताच त्यांनी सायरन वाजविल्याने लोकही जमा झाले. दोघे दरोडेखोर हे मोटरसायकलवर हेल्मेट घालून आले होते. सायरन वाजल्यावर तातडीने ते पसार झाले. दरम्यान, नेगी यांना रावेर येथे उपचारार्थ हलविले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. काही वेळातच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून किती लूट झाली व इतर माहिती पोलीस घेत आहेत.