पाचोरा शहरातील रस्त्यांचा होणार कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:21 IST2021-08-24T04:21:31+5:302021-08-24T04:21:31+5:30
भुयारी मार्गापासून सिंधी कॉलनीपर्यंत असलेल्या रस्त्यांच्या कामासाठी हा निधी वापरला जाणार असून, यापूर्वी भुयारी मार्गापासून भडगाव रोड परिसरातील रस्त्यांच्या ...

पाचोरा शहरातील रस्त्यांचा होणार कायापालट
भुयारी मार्गापासून सिंधी कॉलनीपर्यंत असलेल्या रस्त्यांच्या कामासाठी हा निधी वापरला जाणार असून, यापूर्वी भुयारी मार्गापासून भडगाव रोड परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याशिवाय पाचोरा शहरातील मुख्य पुलांचे कामदेखील युद्धपातळीवर सुरू असून, कृष्णापुरी, पांचाळेश्वर पूल आणि बाहेरपुरा परिसराला जोडणारा पूल वर्षभराच्या आत पूर्णत्वास जाईल, अशी माहिती देताना त्यांनी शहरातील ३२ ‘ओपन स्पेस’च्या सुशोभिकरणासाठीदेखील पाच कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे सांगितले.
प्रत्येक कॉलनीत असणाऱ्या वृद्ध महिला तसेच बालगोपाळांना फिरण्यासाठी, खेळण्यासाठी आणि व्यायामासाठी एक हक्काची जागा निर्माण होणार आहे. यावेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, गंगाराम पाटील, उद्योजक मुकुंद बिल्दीक, नगरसेवक शरद पाटे, दत्तात्रय जडे, सतीश चेडे, शीतल सोमवंशी, राम केसवानी, दादाभाऊ चौधरी, किशोर बारावकर, प्रवीण ब्राम्हणे, राजेश पाटील उपस्थित होते.