भुसावळमधील रस्त्यांवर चिखलच चिखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:11 IST2021-06-19T04:11:53+5:302021-06-19T04:11:53+5:30
भुसावळ : येथे प्रभाग क्रमांक १२ व १५ मध्ये शिवाजी नगर आगाखान वााडा तसेच डी एल हिंदी हायस्कूल ...

भुसावळमधील रस्त्यांवर चिखलच चिखल
भुसावळ : येथे प्रभाग क्रमांक १२ व १५ मध्ये शिवाजी नगर आगाखान वााडा तसेच डी एल हिंदी हायस्कूल परिसरात बऱ्याच दिवसांपासून रस्ते खराब झालेले आहे. पावसाळ्यात तर चिखलमय स्थिती होते. यामुळे या भागातील रहिवाशांचे खूपच हाल होत आहे.
याबाबत न.पा. कार्यालयात वारंवार अर्ज करून देखील काहीच दखल घेतले गेलेली नाही. रस्त्यावरून येणे -जाणे नागरिकांना मुश्कील झालेले आहे. व्यक्ती पायदळसुद्धा चालू शकत नाही अशी रस्त्यांची अवस्था झाली आहे. तसेच रस्त्यावरील धूळ व माती उडून प्रदूषण पसरते. परिणामी परिसरातील बऱ्याच नागरिकांची तब्बेत खराब होत आहे. पावसाळ्यात तर स्थिती खूपच खराब होत असल्याने नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झालेला आहे. वाहन चालकांना वाहन चालवणेसुद्धा मुश्कील झालेले आहे. बऱ्याचदा दुचाकी चालकचालक रस्त्यात पडले आहेत. नगरपालिका प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर रस्ते तयार करून द्यावे, असे निवेदन मुख्याधिकारी संदीप चिद्रवार व नगराध्यक्ष रमण भोळे यांना प्रभागातील सामाजिक कार्यकर्ता पंकजराव मधुकरराव हिंगणे, ज्ञानेश्वर जगदाळे, हितेश टकले, पप्पू वर्मा, फिरोज शेख आदींनी सादर केले.
प्रभाग १२ व १५ मधील रस्त्यांची अशी दुर्दशा झाली आहे.