मारूळसह परिसरातील रस्ते गेले खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:13 IST2021-06-03T04:13:11+5:302021-06-03T04:13:11+5:30

मारूळ, ता. यावल : मारुळसह परिसरातील रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाली असल्यामुळे संपूर्ण रस्ते खड्ड्यात गेले असून, या खड्डेमय रस्त्यांमुळे ...

Roads in the area with Marul went into the pit | मारूळसह परिसरातील रस्ते गेले खड्ड्यात

मारूळसह परिसरातील रस्ते गेले खड्ड्यात

मारूळ, ता. यावल : मारुळसह परिसरातील रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाली असल्यामुळे संपूर्ण रस्ते खड्ड्यात गेले असून, या खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. मारूळ ते हंबर्डी, मारूळ ते हिंगोणा तसेच मारूळ ते तिळ्या या सर्व रस्त्यांचे अक्षरश: तीन तेरा वाजले आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही. मारूळ ते हिंगोणा जवळपास सहा किलोमीटर अंतर आहे. मारूळ ते हंबर्डी हे चार किलोमीटर अंतर आहे व मारूळ ते तिळ्या हे आठ किलोमीटर अंतर आहे.

या सर्व रस्त्यांची दुर्दशा झाली असल्यामुळे रस्त्यावर वाहन चालविताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या सर्व रस्त्यांच्या दोन्ही बाजूकडील साइडपट्ट्यांची गेल्या काही वर्षापासून दुरुस्ती व भराव न करण्यात आल्यामुळे साइडपट्ट्या पूर्णपणे निकामी झालेल्या आहेत. साईडपट्ट्या फारच खोल झाल्या असल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना साइड दिली तरी अपघात होण्याच्या संभव आणि नाही दिली तरीही अपघाताचे संकट अशी दुहेरी स्थिती झाली आहे. यामुळे या रस्त्यावर साइड देण्यावरून वाहनचालकांमध्ये नेहमीच शाब्दिक वाद होत असतात. तसेच दुचाकीवर सोबत महिला प्रवासी असेल तर परिस्थिती आणखीच बिकट होते. या सर्व रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्ती वा साइडपट्ट्या भरवाचे काम करण्यात आले नाही.

या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती अशी मागणी परिसरातील वाहनधारकांमधून होत आहे.

Web Title: Roads in the area with Marul went into the pit