अतिक्रमणाने व्यापला रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:18 PM2019-07-18T12:18:58+5:302019-07-18T12:19:55+5:30

दुचाकींचे अतिक्रमण

Road encroached on the road | अतिक्रमणाने व्यापला रस्ता

अतिक्रमणाने व्यापला रस्ता

Next

रेल्वे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे स्टेशनसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला लागून सकाळपासून ठिकठिकाणी दुचाकींचे अतिक्रमण असते. परिणामी स्थानकामध्ये यायला आणि जायलही जागा रहात नाही. उभ्या आडव्या दुचाकींमुळे पडण्याचीदेखील शक्यता असते. विशेष म्हणजे महिला प्रवाशांना तर अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दररोज दिसून येते. गेल्या आठवड्यात तर दुचाकी पार्किंगवरुन मोठा वाद झाला. एकमेकांच्या दुचाकींचा त्यांना थोडादेखील धक्का सहन झाला नाही. लगेच ते हमरी-तुमरीवर आले होते. अशा प्रकारे या अतिक्रमणामुळे अधून-मधून वाद उद्भभवत आहेत. सकाळी पॅसेंजर आल्यावर तर रिक्षावाले प्रवाशी घेण्यासाठी रस्त्यावरच उभे असतात. यामुळे अधिकच गर्दी होते. अनेकवेळा रिक्षाचालकदेखील स्टेशनमध्ये नातेवाईकांना सोडण्यासाठी आल्यावर दुचाकींसह रस्त्यावर खाद्य पदार्थ विक्रतेही बसलेले असतात. यामुळे स्टेशनसमोरील कोंडीत अधिकच भर पडत आहे. पूर्वी बॅरिकेटस् नसल्यामुळे प्रवासी थेट दादऱ्यापर्यंत दुचाकी आणत होते. मात्र गेल्यावर्षी बॅरिकेटस् बसविल्यामुळे नागरिक रस्त्यावर गाड्या लावत आहेत. रेल्वे पोलीसही या विक्रेत्यांवर कारवाई करीत नाही. पोलीसच कारवाई करीत नसतील तर इतर प्रवाशी कशाला बोलतील, असा सवाल अनेक वेळा उपस्थित होतो. जर एखाद्या प्रवाशाने विरोध केला तर वाद घडण्याची भिती असते. त्यामुळे प्रवाशीदेखील दुर्लक्ष करतात. वाहनांच्या अतिक्रमणावरुन मोठा वाद झाला तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांकडून उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
- अजय वाघ, प्रवासी.

Web Title: Road encroached on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव